शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील वाघांना ‘कॉरिडोर’ची गरज

By admin | Updated: September 17, 2015 01:24 IST

विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या वाढली असून हे वाघ संरक्षित क्षेत्राबाहेर पडत असल्याने त्यांना ‘कॉरिडोर’ची गरज भासू लागली आहे. काही दिवसांपूर्वी बोर

- गणेश वासनिक,  अमरावतीविदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या वाढली असून हे वाघ संरक्षित क्षेत्राबाहेर पडत असल्याने त्यांना ‘कॉरिडोर’ची गरज भासू लागली आहे. काही दिवसांपूर्वी बोर अभयारण्यातून स्थलांतरित झालेल्या दोन वाघांचा अद्यापही शोध लागलेला नाही.विदर्भात मेळघाट, ताडोबा, पेंच व्याघ्र प्रकल्पासह बोर, टिपेश्वर अभयारण्यात वाघ, बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, व्याघ्र प्रकल्प म्हणजेच संरक्षित क्षेत्राबाहेर वाघांचे अस्तित्व दिसून येत असल्याने वन्यजीव विभागासाठी ती चिंतेची बाब आहे. मागील पाच वर्षांत देशात १,७०० वाघांची नोंद होती. व्याघ्रगणनेनंतर आता ३,५१० वाघ असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमरावतीच्या मालखेड, पोहरा तर धुळे जिल्ह्यात संरक्षित क्षेत्राबाहेर पट्टेदार वाघांचे अस्तित्व असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) दरवर्षी भारतीय वन्यजीव संस्थेमार्फत देशातील ३९ व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची प्रगणना करते. त्यानुसार विदर्भात वाघांची संख्या वाढली असली तरी व्याघ्र प्रकल्पाबाहेर संरक्षित क्षेत्र वगळून त्यांचे अस्तित्व दिसून येत आहे. त्यामुळे वाघांचे ‘कॅरिडोर’ निर्माण झाल्यास एका जंगलातून दुसऱ्या जंगलात त्यांना संचार करता येणार आहे. मेळघाट ते अकोट, पोहरा, मालखेड तर पेंच ते बोर पुढे मालखेड, पोहरा असा ‘कॉरिडोर’ निर्माण केल्यास वाघांचे संरक्षण होऊ शकेल. वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यातून यापूर्वी एक वाघ स्थलांरित झाला होता. पोहरा, मालखेड जंगलात अस्तित्व दिसले होते. त्यानंतर बोर अभयारण्यातून दोन वाघांचे स्थलांतरण झाले. ते कोणत्या जंगलात गेले, हे अद्याप वनविभागाने स्पष्ट केलेले नाही. काही दिवसांपूर्वी पोहरा, मालखेड जंगलात बोर अभयारण्यातून वाघ आल्याचे स्पष्ट झाले होते. पुन्हा दोन वाघ बोर अभयारण्यामधून स्थलांतरित झाल्याची माहिती आहे, मात्र त्यांचे अस्तित्व सिद्ध झाले नाही. संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना आखल्या जात आहेत.- नीनू सोमराज, उपवनसंरक्षक, अमरावती