मुंबई : बहुचर्चित व गेली तेरा वर्षे चाललेला सलमान खानचा हिट अँड रन अखेर अंतिम टप्प्यात आला आहे. सलमान या प्रकरणात नक्की दोषी आहे की नाही, हे आज बुधवारी ठरणार आहे.
सलमान दोषी आढळल्यास त्याला किती शिक्षा ठोठवावी, यावर सरकारी पक्ष युक्तिवाद करेल. त्यानंतर बचाव पक्षही आपली बाजू मांडेल. उभय पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालय सलमानला शिक्षा सुनावेल. सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप आहे. या गुन्ह्यासाठी १० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. त्यामुळे सलमान दोषी आढळल्यास त्याला किती शिक्षा होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ही घटना २८ सप्टेंबर २००२ रोजी घडली. सलमानने लँड कु्रझर गाडी भरधाव चालवत वांद्रे येथील अमेरिकन एक्सप्रेस बेकरीजवळील फुटपाथवर चढवली. पदपथावर झोपलेले पाच जण गाडीखाली चिरडले गेले. यातील एकाचा बळी गेला. याप्रकरणी सलमानविरोधात वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात भरधाव गाडी चालवण्याचा खटला सुरू होता. मात्र २००३ मध्ये सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला व हा खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. २८ साक्षीदार तपासले> सत्र न्यायाधीश डी. डब्लू. देशपांडे यांच्यासमोर हा खटला चालला. सलमानचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाने २७ साक्षीदार तपासले, तर सलमान निर्दोष असल्याचे सिद्ध करण्यासाठी एकच साक्षीदार तपासला. च्त्यानंतर या घटनेबाबत उभय पक्षांचा युक्तिवाद झाला. युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने याचा निकाल राखून ठेवला.खटल्यातील महत्त्वाच्या तारखा२८ सप्टेंबर २००२ रोजी ही घटना घडली. त्याच दिवशी सलमानला अटक झाली व त्याची जामिनावर सुटकाही झाली.७ आॅक्टोबर २००२ सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी पुन्हा सलमानला अटक झाली व त्यानंतर त्याला जामीनही मंजूर झाला.2003 बचाव पक्षाने सदोष मनुष्यवधाच्या आरोपाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने हा गुन्हा रद्द केला. सरकारी पक्षाने याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने याचा निर्णय सुनावणी न्यायालयावर सोडला.2006 मध्ये वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात याचा खटला सुरू.2011सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यासाठी सरकारी पक्षाने विशेष न्यायालयात अर्ज केला.३१ जानेवारी २०१३ - वांद्रे न्यायालयाने सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यास परवानगी दिली.२८ एप्रिल २०१४ : सत्र न्यायालयात सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू झाला.सलमानवरील आरोपसदोष मनुष्यवध - दहा वर्षे शिक्षाभरधाव गाडी चालवणे - दोन वर्षेनिष्काळजीपणा - दोन वर्षेगंभीर दुखापत करणे - सहा महिनेकिरकोळ दुखापत करणे - दोन महिने