शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

चिवचिवाट झालाय दुर्मीळ

By admin | Updated: April 28, 2016 02:13 IST

मावळ तालुका पर्यटनस्थळे व निसर्गरम्यतेमुळे प्रसिद्ध आहे. मात्र, वाढत्या नागरीकरणामुळे तालुक्यातील पक्ष्यांचे प्रमाण कमी झाले आहे. शहरात तर चिमण्यांचा चिवचिवाट हरवल्यासारखाच आहे.

करंजगाव : मावळ तालुका पर्यटनस्थळे व निसर्गरम्यतेमुळे प्रसिद्ध आहे. मात्र, वाढत्या नागरीकरणामुळे तालुक्यातील पक्ष्यांचे प्रमाण कमी झाले आहे. शहरात तर चिमण्यांचा चिवचिवाट हरवल्यासारखाच आहे.तालुक्यातील डोंगरदऱ्यांत साग, बाभूळ, भेंडी, बोर, कलक, बांबू, आंबा, चिंच, जांभूळ, नीलगिरी आदी झाडे आहेत. गेल्या काही वर्षांत डोंगरदऱ्या मध्येही बंगले, फार्महाऊस बांधण्यात आले आहेत. मानवी वावर वाढल्याने आणि पर्यावरणाची काळजी न घेतल्याने अनेक ठिकाणी निसर्गाचा ऱ्हास होताना दिसत आहे. वाढलेल्या सिमेंटच्या जंगलामध्ये मोबाइल टॉवरची गर्दी दिसत आहे. काही टॉवर हे घराच्या स्लॅबवर आहेत. मोबाइल टॉवरमुळे चिमण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. पूर्वी घरांमधील आजोबा, पणजोबांसह देवदेवतांचे फोटो लावलेले असायचे. त्यांच्या मागे चिमण्या घरटी करून राहत. पण, आता काँक्रिटच्या भिंतींमुळे चिमण्यांना घरटी करायला चांगली जागाच मिळत नाही. आता या संस्कृतीचे दर्शनही दुर्लभ होत आहे. मोबाइल टॉवरपासून इमारतीच्या मालकास दरमहा चांगले उत्पन्न मिळते. मात्र, त्यामुळे निष्पाप चिमण्यांचा बळी जात आहे. चिमण्या व इतर पक्ष्यांचे प्रमाण कमी झाले असून, काही ठिकाणी तर क्वचित एखादी चिमणी दिसते. पूर्वी शेतामध्ये धान्य असायचे. तेथे चिमण्यांचे थवे असायचे. धान्य काही ठिकाणी अळ्या, किडे खायला मिळायचे. आता प्लॅस्टिकच्या पिशवीतून धान्य येत असल्यानं चिमण्यांची उपासमार होऊ लागली आहे. शिवाय, मोबाइल टॉवरमधून निघणाऱ्या लहरींमुळे चिमण्या मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. चिमण्यांवर प्रेम असल्याने त्यांच्याबद्दल सर्वांना चिंता आहे, असे नरेंद्र मोदी विचार मंचाचे संस्थापक शैलेंद्र रावळ, केदार शिरसाट, नवनाथ नाणेकर, अतुल दाभणे, विलास देवराम गायकवाड, कुणाल गिरंजे, अभिजित ठकले, सुधीर गायकवाड यांनी सांगितले. प्रत्येकाने अंगणात चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी बसवावी, असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य शंकर काजळे यांनी केले आहे. (वार्ताहर)