शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरजवळ वाघ, बिबट्याचा मृत्यू

By admin | Updated: January 4, 2016 03:16 IST

नागपूरपासून काही अंतरावर असलेल्या देवलापार वन परिक्षेत्रात एका पट्टेदार वाघाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तसेच बुटीबोरी वन परिक्षेत्रातील चिमणाझरी शिवारात रेल्वेच्या धडकेत

नागपूर/देवलापार : नागपूरपासून काही अंतरावर असलेल्या देवलापार वन परिक्षेत्रात एका पट्टेदार वाघाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तसेच बुटीबोरी वन परिक्षेत्रातील चिमणाझरी शिवारात रेल्वेच्या धडकेत एक बिबट्या ठार झाला आहे. या दोन्ही घटना एकाच दिवशी उघडकीस आल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे.देवलापार वन परिक्षेत्रातील (प्रादेशिक) जुनेवानी बीट क्र. ४९२ येथे शनिवारी काही वन कर्मचाऱ्यांना पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. रविवारी त्याची माहिती वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना मिळताच, सर्वांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मृत वाघाशेजारीच रानडुक्कर व चितळसुद्धा मृतावस्थेत आढळून आले. वन अधिकाऱ्यांच्या मते, मृत्यू झालेल्या वाघाचे वय पाच ते सहा वर्षे असून, त्याचा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असावा. परंतु या वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेले नाही. काही प्रत्यक्षदर्शींच्या अंदाजानुसार वाघावार विषप्रयोग करू न त्याची शिकार झाली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या वाघाच्या विष्टेसह आतडे बाहेर आलेले आढळून आले. तसेच शेजारी चितळ व जंगली डुक्कराची शिकार झालेली आहे. यावरू न विषप्रयोगातून या वाघाची शिकारच झाली असावी, असे बोलले जात आहे. रविवारी वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डॉ. चित्रा राऊत यांनी वाघाचे शवविच्छेदन करून मृतदेहाची विल्हेवाट लावली.धक्कादायक घटना वाघाचा असा अचानक मृत्यू झाल्याने धक्का बसल्याचे नागपूरच्या उप वनसंरक्षक ज्योती बॅनजी यांनी सांगितले. वाघाचे शवविच्छेदन करू न त्याचा विसेरा प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. त्याचा रिपोर्ट आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे गूढ उलगडू शकेल. तो वाघ मध्य प्रदेशातील पेंचमधून आला असावा, असा अंदाज आहे. यानंतर त्याने येथे जंगली डुक्कर व चितळाची शिकारसुद्धा के ली. मात्र यानंतर त्याचा अचानक मृत्यू कसा झाला, त्याविषयी गूढ निर्माण झाले आहे, असेही त्या म्हणाल्या.