शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

वाघांच्या देशा

By admin | Updated: January 21, 2015 02:20 IST

सर्वसामान्य माणसांना भारतात कसेही दिवस येवोत, वाघांना मात्र ‘अच्छे दिन’ आल्याचे आज स्पष्ट झाले. २०१०च्या तुलनेत देशात तब्बल ३० टक्के वाघ वाढले

तीन वर्षांत संख्येत झाली ३० टक्के वाढनवी दिल्ली : सर्वसामान्य माणसांना भारतात कसेही दिवस येवोत, वाघांना मात्र ‘अच्छे दिन’ आल्याचे आज स्पष्ट झाले. २०१०च्या तुलनेत देशात तब्बल ३० टक्के वाघ वाढले असून त्यांची संख्या दोन हजार २२६वर पोहोचली आहे. देशातील वाघांची २०१४ची आकडेवारी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज जाहीर केली. जगभरात वाघांची संख्या घटत असताना भारताने मात्र यात वाढ नोंदविली आहे, हे विशेष. २००६ मध्ये देशातील वाघांची संख्या १४११ वर आल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात होती. त्यानंतर केंद्र सरकार आणि विविध पर्यावरणवादी संस्थांनी हातात हात घालून ‘वाघ वाचवा’ मोहीम हाती घेतली. २०१० साली या मोहिमेला यश आले आणि वाघांची संख्या १७०६वर पोहोचली. आता यात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कर्नाटक नंबर वन!कर्नाटक, उत्तराखंड, मध्यप्रदेश, तामिळनाडू आणि केरळात वाघांच्या संख्येत वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यातही कर्नाटक नंबर वन आहे. या राज्यात तब्बल ४०६ वाघांची नोंद झाली आहे. उत्तराखंडमध्ये ३४० वाघांची नोंद झाली आहे. केरळात १३६, तर तामिळनाडूत २२९ वाघ नोंदविले गेले आहेत. २०१०साली कर्नाटकात ३०० वाघ होते. ओडिशा आणि झारखंडमध्ये मात्र वाघांची संख्या घटली आहे. ओडिशामध्ये २०१० साली ३२ वाघ होते, आज ही संख्या २८, तर झारखंडमधील संख्या दहावरून तीनवर आली आहे. मेमध्ये आशियाई सिंहगणनागुजरात सरकारतर्फे दर पाच वर्षांनी होणारी आशियाई सिंहगणना गीरच्या अभयारण्यात २ ते ५ मेच्या दरम्यान होणार आहे. मागील गणना २०१० मध्ये झाली होती. त्यावेळी ४११ सिंहांची मोजणी करण्यात आली होती. च्जगभरातील ७० टक्के वाघ आता एकट्या भारतात असून वाघांचा उत्तम व्यवस्थापन करणारा देश म्हणून आपले नाव झाले असल्याची प्रतिक्रिया जावडेकर यांनी दिली.च्या व्याघ्रगणनेसाठी देशभरात ९ हजार ७३५ कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला. वाघबहुल १८ राज्यांत ३ लाख ७८ हजार ११८ चौरस किलोमीटर परिसर जंगलाने व्यापला आहे. च्प्रेमात पडावी, अशी १५४० दुर्मिळ छायाचित्रे या गणनेदरम्यान मिळाली. वनकर्मचारी, सहभागी संस्था आणि सर्वांच्या पर्यावरणीय दृष्टिकोनामुळेच वाघांची संख्या वाढली आहे.