शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

ए दिल...ची मुश्किल वाढवणा-या मनसे कार्यकर्त्यांच्या पत्नींना तिकीट

By admin | Updated: February 16, 2017 16:23 IST

पाकिस्तानी कलाकार फवाद खानचा सहभाग असलेल्या 'ए दिल है मुश्किल' सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करणा-या मनसे कार्यकर्त्यांच्या पत्नींना राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीचे तिकीट दिले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 16 - पाकिस्तानी कलाकार फवाद खानचा सहभाग असलेल्या 'ए दिल है मुश्किल' सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करणा-या मनसे कार्यकर्त्यांच्या पत्नींना राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीचे तिकीट दिले आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या या सिनेमाला विरोध करण्यासाठी मनसेच्या 12 कार्यकर्त्यांनी मुंबई मेट्रो सिनेमागृहात घुसण्याचा प्रयत्न केला होता. सिनेमात पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्याने मनसेकडून तीव्र विरोध करण्यात आला. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली होती. यातील दोन कार्यकर्त्यांच्या पत्नींना मनसेकडून मुंबई मनपाचे तिकीट देण्यात आले आहे.  
 
प्रीती गव्हाणे आणि वैशाली गंगावणे अशी या दोघींची नावं आहेत. या सर्व घडामोडींवेळी या दोघीही भलत्याचा चर्चेत आल्या आहेत. प्रीती गव्हाणे मनसे विभागीय अध्यक्ष शेखर गव्हाण यांच्या पत्नी आहेत. या चंदनवाडीतील धोबी तलाव वॉर्ड क्रमांक 222 येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. शेखर गव्हाणे यांना मनसेच्या अन्य 12 कार्यकर्त्यांसोबत ऑक्टोबर 2016 मध्ये अटक करण्यात आली होती. 
 
तर शेजारील वॉर्ड क्रमांक 225 मधून वैशाली गंगावणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वैशाली या मनसे कार्यकर्ता सचिन गंगावणे यांच्या पत्नी आहेत, सचिन यांनाही मेट्रो सिनेमामध्ये घुसण्याच्या प्रयत्नात अटक झाली होती. कुलाबामधील मनसेचे उपविभागीय प्रमुख निशांत गायकवाड यांनी सांगितले की, आम्ही आमच्या क्षेत्रातील पार्किंग, रस्त्यांच्या दुरवस्थेसंबंधीत मुद्दे उपस्थित करत आहोत. शिवाय, 'ए दिल है मुश्किल' सिनेमाला आम्ही केलेला विरोधही लोकांना सांगत आहोत. पाकिस्तानी कलाकारांवर आम्हाला बंदी हवी आहे. हा मुद्दा देशभक्तीशी जोडलेला असून लोकांना याची माहिती आहे. दरम्यान,निशांत यांनाही 'ए दिल...'विरोधातील आंदोलनात अटक करण्यात आली होती. 
 
नेमके काय घडले होते?
19 ऑक्टोबर 2016 रोजी मनसेच्या 12 कार्यकर्त्यांना दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमागृहात घुसण्याच्या प्रयत्नात अटक करण्यात आली होती.  'ए दिल है मुश्किल' सिनेमामध्ये पाकिस्तान कलाकार फवाद खान असल्याने सिनेमाच्या प्रदर्शनाला मनसेकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. उरी येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेने पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी घालण्याची मागणी केली होती. दरम्यान, या आंदोलनावेळी पोलिसांनी सिनेमागृहात घुसखोरीचा प्रयत्न करणा-या मनसेच्या 12 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.