शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

शौचालयाकरिता ‘ती’ने अखेर मंगळसूत्र विकले...!

By admin | Updated: November 7, 2014 05:05 IST

सासरच्या मंडळींचे हे बोल ऐकून अस्वस्थ झालेल्या संगीताने मागचापुढचा विचार करता स्वत:च्या गळ्यातील मंगळसूत्र विकून त्यातून शौचालय बांधून काढले.

मुंबई : ‘शौचालय ही गरज नसून श्रीमंती चैन आहे...!’ सासरच्या मंडळींचे हे बोल ऐकून अस्वस्थ झालेल्या संगीताने मागचापुढचा विचार करता स्वत:च्या गळ्यातील मंगळसूत्र विकून त्यातून शौचालय बांधून काढले. तिच्या या कृतीने संतापलेल्या पतीसह सासरच्या लोकांनी तिच्याशी अबोला धरला, पण राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी तिला स्वखर्चाने सौभाग्यलेणे बहाल केले, तेव्हा तिच्या धाडसाचे कौतुक राज्यभर झाले.वाशिम जिल्ह्यातील सायखेडा हे सुमारे बाराशे लोकवस्तीचे गाव. परंतु अनेक घरांत शौचालय नाही. अनेक महिला रस्त्याच्या कडेला नैसर्गिक विधीकरिता बसतात. रस्त्यावरून एखादे वाहन जाऊ लागले की महिलांना तोंड लपवावे लागते. उघड्यावर शौचाला बसावे लागत असल्यामुळे होणाऱ्या कुचंबणेमुळे संगीता अव्हाळे ही विवाहिता प्रचंड अस्वस्थ होती. त्यातच तिची मुलगी वयात येऊ लागलेली. त्यामुळे घरात शौचालय उभारण्याकरिता संगीताने हट्ट धरला. मात्र शौचालय ही श्रीमंती चैन असल्याचे सांगत सासरच्या मंडळींनी त्यास नकार दिला, तर आर्थिक अडचण पुढे करीत नवऱ्यानेही हात वर केले. शेवटी स्वत:च्या हिमतीवर शौचालय बांधण्याचा निर्धार तिने केला. मात्र शौचालय बांधायचे तरी कसे, असा प्रश्न होता. म्हणून तिने सर्व दागिने विकले आणि बांधकाम सुरू केले. मात्र त्यातूनही बांधकामाचा खर्च भागला नाही तेव्हा स्वत:चे मंगळसूत्र विकून शौचालयाचे बांधकाम केले. (प्रतिनिधी)