शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

वादळी पावसाचा तडाखा

By admin | Updated: June 6, 2016 23:50 IST

अहमदनगर: शहरासह जिल्ह्याला रविवारी रात्री झालेल्या पावसाचा मोठा तडाखा बसला़ घरांच्या पडझडीत तिघे ठार तर, १३ जण जखमी झाले आहेत़ जिल्ह्यात ठिकठिकाणी सुमारे

अहमदनगर: शहरासह जिल्ह्याला रविवारी रात्री झालेल्या पावसाचा मोठा तडाखा बसला़ घरांच्या पडझडीत तिघे ठार तर, १३ जण जखमी झाले आहेत़ जिल्ह्यात ठिकठिकाणी सुमारे १३८ घरांची पडझड झाली़विद्युत तारांवर झाडे व फांद्या उन्मळून पडल्याने सोमवारी दुपारपर्यंत विद्युत पुरवठा खंडित होता़ मुळा धरण परिसरातील विद्युत पुरवठाही खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प होता़ त्यामुळे शहरासह उपनगरांतील जनजीवन विस्कळीत झाले होते़ दरम्यान महावितरणकडून दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आल्याने काही ठिकाणी सायंकाळी विद्युत पुरवठा सुरळीत झाला़शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने रविवारी जोरदार हजेरी लावली़ घराचा पत्रा लागून श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील भिसान इसाक शेख (वय-४) हा बालक जागीच ठार झाला़ नवनागापूर येथे भिंत कोसळून आदित्य साळुंके (वय १३) याचा मृत्यू झाला़ नगर तालुक्यातील अरणगाव येथील दादा ढमढेरे (वय, ५५) हे मयत झाले़ जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या घरांच्या पडझडीत १३ जण जखमी झाले असून, जखमीमध्ये संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी येथील हेमलता मतू व कैलास भोलाराम, शेवगाव तालुक्यातील दहीफळ येथे राजू भाऊसाहेब पांढरे, कमल राजू पांढरे, प्रथमेश राजू पांढरे, उत्तम सीताराम ठोंबरे, संजय भाऊसाहेब ठोंबरे, संजय भाऊसाहेब ठोंबरे, गोजराबाई ठोंबरे हे अंगावर पत्रे पडून जखमी झाले आहेत़ (प्रतिनिधी)रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने शहर पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा सोमवारी दिवसभर बंद राहिला. २४ तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला. मंगळवारपासून शहराचा पाणी पुरवठा पूर्ववत होईल अशी माहिती सूत्रांनी दिली. रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाने मुळानगर, विळद पंपिंग स्टेशन येथील वीज पुरवठा खंडित झाला. रविवारी रात्रभर पाणी उपसा करणारे पंप बंद राहिल्याने शहर पाणी वितरण व्यवस्थेच्या टाक्या भरल्या नाहीत. परिणामी शहरासह उपनगराचा पाणी पुरवठा बंद राहिला.शहर पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणी पुरवठा झाला नाही. वीज नसल्याने हौदात थोडेसे असलेल्या पाण्याने अपार्टमेंटच्या टाक्या भरता आल्या नाहीत. काही घरांत तर पिण्याचे पाणीही नाही अन् वापराचेही नाही. विंधन विहीर असली तरी वीज नसल्याने बोअरिंगचे पाणीही मिळेना. विहीर कोसळलीइसळक येथील शेतकरी महादेव खामकर यांनी ८ ते १० लाख रुपये खर्चून विहिरीचे बांधकाम केले होते़ मात्र वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विहिरीचे बांधकाम पडले़ विहीर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे़ झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता़‘मुळा’ लाईन उध्दवस्तवादळाचा सर्वाधिक फटका बसला नगर ते मुळा धरण या २७ किलोमीटर वीजवाहिनीला. यादरम्यान एकूण २० ते २५ ठिकाणी विस्कळीतपणा आला होता. काही ठिकाणी तारा तुटल्या, तर बऱ्याच ठिकाणी वीजवाहिनीवर फांद्या पडल्या होत्या. सोमवारी रात्रीपर्यत दुरूस्तीचे काम सुरू होते. ‘मुळा’त नवीन पाणीमुळा धरण पाणलोट क्षेत्रात राहुरी तालुक्यात २५ तर मुळानगर परिसरात ३५ मि़ मी़ पाऊस झाला़ दगडांच्या खाणीत जोरदार पावसाचे आगमन झाले़ मुळा धरणात सोमवारी दिवसभरात एकूण ३१ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे़ त्यामुळे मुळा धरणातील पाणी पातळीत १५ फुटाने वाढ झाली आहे़ दहा संसार उघड्यावरनगर तालुक्यातील निंबळक येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने निंबळक- इसळक परिसरातील ८ ते १० घरांचे पत्रे उडाले़ त्यामुळे सुमारे दहा कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे़ निंबळक येथील रहिवासी भिमा कदम, रामदास शिंदे, कुंडलिक वायकर, सदाशिव वायकर यांच्या घरावरील पत्रे उडाले़ दयानंद देवकर, मनोज रोकडे, किसन यादव, रामकिसन गेरंगे, आदिनाथ गेरंगे, आदिनाथ गेरंगे यांच्या घरांच्या भिंती कोसळल्याने त्यांची तारांबळ उडाली़आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवाराजिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी मागील आठवड्यात जिल्ह्यातील सर्व यंत्रणांची बैठक घेऊन प्रत्येक तालुका मुख्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले होते़ मात्र अद्याप एकाही तालुक्यात हा कक्ष सुरू करण्यात आला नाही़ त्यामुळे बाधित कुटुंबांना मदत मिळण्यास विलंब होत असून, काही ठिकाणी पंचनामे करण्यासाठी प्रशासन पोहोचले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़