शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

थुकरटवाडीत सुलतानची हवा

By admin | Updated: June 30, 2016 19:01 IST

लीवुडचा भाईजान आणि दबंग खान अशी ओळख असलेला सुपरस्टार सलमान खानही या कार्यक्रमात सहभागी झाला निमित्त होतं त्याच्या सुलतान या आगामी प्रदर्शित होणा-या चित्रपटाचं.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३० : झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या ची हवा आता केवळ मराठी मनोरंजनसृष्टीपुरती मर्यादित राहिली नाहीये. आजवर अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांना हक्काचं व्यासपीठ देऊन त्यांच्या प्रसिद्धीची हवा घरोघरी निर्माण करण्यात हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे. यात सहभागी झालेल्या कलाकारांची आणि त्यांच्या कलाकृतीची हमखास चर्चा होणार हे ठरलेलं आहे. या कार्यक्रमाची हीच लोकप्रियता बघून यात आता बॉलिवुडची मंडळीही हजेरी लावत आहेत.

आजवर या कार्यक्रमात शाहरूख खान, रितेश देशमुख, सोनम कपूर, जॉन अब्राहम, विद्या बालन सारख्या अनेक लोकप्रिय हिंदी स्टार्सने हजेरी लावत या कार्यक्रमाला चार चांद लावले आणि या यादीत आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. बॉलीवुडचा भाईजान आणि दबंग खान अशी ओळख असलेला सुपरस्टार सलमान खानही या कार्यक्रमात सहभागी झाला निमित्त होतं त्याच्या सुलतान या आगामी प्रदर्शित होणा-या चित्रपटाचं. येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच ४ आणि ५ जुलैला रात्री ९.३० वा. सलमान खान सोबत थुकरटवाडीतील मंडळींनी केलेली धम्माल बघायला मिळणार आहे.

थुकरटवाडीकरांचा मैने ट्राय कियाकार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकप्रिय कलाकारांच्या एखाद्या गाजलेल्या कलाकृतीवर आपला वेगळा चित्रपट काढण्याची हौस थुकरटवाडीतील मंडळींना आहे. सलमान खानने ज्या चित्रपटाद्वारे बॉलिवुडमध्ये पदार्पण केलं होतं तो चित्रपट म्हणजे मैने प्यार किया. याच चित्रपटावर आधारित मैने ट्राय किया हे धम्माल स्किट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे ज्यात प्रेमची भूमिका साकारलीये भाऊ कदमने तर सुमनची भूमिका केलीये श्रेया बुगडेने. आपल्या चित्रपटाचं हे नवं रूप बघून सलमानचीही हसून हसून पुरेवाट लागली.

बाप की अदालत मध्ये सलमानवर आरोपथुकरटवाडीतील बाप की अदालतमध्ये सलमानला आरोपीच्या पिंज-यात उभं करण्यात आलं. यावेळी सलमानवर अनेक मजेदार आरोप करण्यात आले ज्याची तेवढीच धम्माल उत्तरे सलमानने दिली. सरकारी वकीलाच्या भूमिकेत असलेल्या कुशलच्या धमाकेदार एन्ट्रीला सलमानने खळखळून दाद दिली.

सलमान आणि सुलतानसुलतानच्या सेटवरच्या अनेक मजेदार आठवणी सलमानने यावेळी सांगितल्या. या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत,त्या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि सध्या देशात असलेल्या कुस्ती या खेळाबद्दलच्या परिस्थितीतीवरही तो भरभरून बोलला.

मराठमोळा सलमानया कार्यक्रमाचं सर्वात मोठं आकर्षण ठरणार आहे ते सलमानचं मराठमोळं रूप. या पूर्ण कार्यक्रमात सलमानने जास्तीत जास्त मराठीतच बोललाय. सलमानला सर्व मराठी नीट कळतं आणि आपल्या घरातही आई आणि तिचे नातेवाईक कसे मराठी बोलतात याबद्दलचे धम्माल किस्सेही सलमानने यावेळी सांगितले. यावेळी कलाकारांच्या विनंतीवरून सलमानने झिंगाट आणि शांताबाई या गाण्यावर अगदी मराठमोळा ठेकाही धरला.

बॉलिवुडसाठी दबंग असणा-या या सुपरस्टारचं हे मराठमोळं रूप बघायला प्रेक्षकांना निश्चितच आवडेल. येत्या सोमवार आणि मंगळवारी चला हवा येऊ द्या चे हे दोन्ही भाग रात्री ९.३० वा. झी मराठीवरून प्रसारित होतील.