शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

येत्या २४ तासांत जोर‘धार’, वेधशाळेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 17:39 IST

ऐन गणेशोत्सवात संततधारेने चांगलाच जोर पकडला असून, पावसाच्या वाढत्या सरींमुळे पडझडीच्या घटनांत वाढ झाली आहे. शिवाय वाहतुकीचा वेग मंदावल्याने कोंडीही वाढली असून, सोमवारी दिवसभर लागून राहिलेल्या पावसाने मुंबईकरांना चांगलेच झोडपून काढले आहे

मुंबई : ऐन गणेशोत्सवात संततधारेने चांगलाच जोर पकडला असून, पावसाच्या वाढत्या सरींमुळे पडझडीच्या घटनांत वाढ झाली आहे. शिवाय वाहतुकीचा वेग मंदावल्याने कोंडीही वाढली असून, सोमवारी दिवसभर लागून राहिलेल्या पावसाने मुंबईकरांना चांगलेच झोडपून काढले आहे. येत्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात अधूनमधून पावसाच्या जोरदार, अतिजोरदार सरी कोसळतील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.सोमवारी बोरीवली, गोरेगाव, अंधेरी, विलेपार्ले, बीकेसी, माहीम, दादर, वरळी, महालक्ष्मी, गिरगाव, मरिन ड्राइव्ह, कुलाबा, भायखळा, लालबाग, परळ, सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी आणि मुलुंड येथे तर संततधार कायम होती.पावसामुळे भायखळा, लालबाग, परळ, दादर, माटुंगा आणि सायन येथे वाहतुकीचा वेग मंदावला. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली. पूर्व उपनगरात लाल बहादूर शास्त्री मार्गावर कुर्ला डेपो, शीतल सिनेमागृह, कमानी आणि घाटकोपर येथील श्रेयस टॉकीज येथील वाहतुकीचा वेग मंदावल्याने कोंडीत वाढ झाली होती. सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडवरही वाहतूक संथ झाल्याने कोंडीत वाढ झाली होती. परिणामी, चेंबूर आणि कुर्ल्याकडे जात असलेल्या रस्त्यावर वाहनांची गर्दी कायम होती. कुर्ला-अंधेरी रस्त्यावरही वाहतुकीचा वेग मंदावला होता. परिणामी, कमानी, बैलबाजार, साकीनाका, मरोळ येथील कोंडीत वाढ झाली. पश्चिम उपनगरात सांताक्रुझ, विलेपार्ले, बोरीवलीसह रेल्वे स्थानकांकडे जाणाºया वाहनांचा वेगही संथ होता.दरम्यान शहरात दोन, पूर्व उपनगरात एक आणि पश्चिम उपनगरात एक अशा एकूण चार ठिकाणी बांधकामाचा भाग पडल्याच्या घटना घडल्या. तर पूर्व उपनगरात दोन, पश्चिम उपनगरात एक अशा एकूण तीन ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत. शहरात एक, पूर्व उपनगरात दोन अशा एकूण तीन ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.डोंगरीमध्ये एक जखमीशहरात दोन, पूर्व उपनगरात एक आणि पश्चिम उपनगरात एक अशा एकूण चार ठिकाणी बांधकामाचा भाग पडल्याच्या घटना घडल्या.दरम्यान येत्या २४ तासांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.