शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

आर्किटेक्चरच्या पिढ्या घडूनही नियमावलीचा जाच

By admin | Updated: July 15, 2017 01:05 IST

बीकेपीएस कॉलेज आॅफ आर्किटेक्चरकडे (अभिनव अर्किटेक्चर) नसल्याचे दिसून येत असले तरी या महाविद्यालयाने आर्किटेक्टरच्या अनेक पिढ्या घडवल्या आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कौन्सिल आॅफ आर्किटेक्चरच्या नियमावलीतील काही बाबी बीकेपीएस कॉलेज आॅफ आर्किटेक्चरकडे (अभिनव अर्किटेक्चर) नसल्याचे दिसून येत असले तरी या महाविद्यालयाने आर्किटेक्टरच्या अनेक पिढ्या घडवल्या आहेत. येथील विद्यार्थ्यांनी केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला आहे. महाविद्यालय बंद झाल्याने गरीब, गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि आर्किटेक्चर क्षेत्राचे मोठे नुकसान होणार आहे, असे मत महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव अनुदानित महाविद्यालय असल्याने बीकेपीएस आर्किटेक्चर कॉलेजमध्ये राज्यातील गरीब व गुणवंत विद्यार्थी प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करतात. आर्किटेक्चर महाविद्यालयांची संख्या कमी असल्याने विनाअनुदानित महाविद्यालयांची मागणी वाढत आहे. मात्र संस्थेच्या दुर्लक्षामुळे पुण्यातील एकमेव आर्किटेक्चर महाविद्यालय बंद होण्याच्या मार्गावर आहे. राज्यात एकूण ८७ आर्किटेक्चर महाविद्यालये असून त्यांची प्रवेशक्षमता ५ हजार ६९७ आहे. पुणे विभागात ३३ महाविद्यालये असून, २ हजार १८० विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. परंतु पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने बीकेपीएस आर्किटेक्चरचे प्रथम वर्षाचे प्रवेश बंद करण्यात आले आहेत. या वर्षी प्रवेश न झाल्यास पुढील वर्षी द्वितीय वर्षाचे वर्ग भेटणार नाहीत. परिणामी पाच वर्षांत महाविद्यालय बंद होईल.सध्या राज्यातील बहुतेक विनाअनुदानित आर्किटेक्चर महाविद्यालयांचे एक वर्षाचे शुल्क एक ते सव्वा लाखाच्या पुढे आहे. परंतु अनुदानित महाविद्यालय असल्याने बीकेपीएस आर्किटेक्चर कॉलेजचे शुल्क केवळ २० हजार रुपये आहे. त्यामुळे गरीब, आर्थिक स्थिती चांगली नसणाऱ्या विद्यार्थ्यांना येथे शिक्षण घेणे शक्य होते. महाविद्यालय बंद झाल्यास गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे बंद होतील, असे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व आर्किटेक्चर माधव जोशी व माधव हुंडेकर यांनी सांगितले. या महाविद्यालयाकडे जागा कमी आहे. तसेच शासनाच्या धोरणामुळे प्राध्यापकांची संख्या कमी आहे. मात्र, महाविद्यालयातील विद्यार्थी राज्यात देशात व देशाबाहेर उल्लेखनीय काम करीत आहेत. राज्यातील इतर महाविद्यालयांत प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. त्याचप्रमाणे बांधकाम व इतर क्षेत्रातील कामगिरीमुळे त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या महाविद्यालयासाठी कोणतीही मदत करण्याची तयारी माजी विद्यार्थ्यांची आहे. महाविद्यालय बंद पडू नये, यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह राज्यातील विविध अधिकाऱ्यांना निवदेन देण्यात आले आहे, असेही जोशी व हुंडेकर यांनी सांगितले.अनुदानित असल्यानेच अडचण विनाअनुदानित महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारून महाविद्यालयांत आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करता येतात. मात्र अनुदानित महाविद्यालयांना शासनाकडून कोणतेही अनुदान मिळत नाही. त्यामुळे संस्थाचालकांना तोटा सहन करून महाविद्यालये चालवावी लागतात. बीकेपीएस आर्किटेक्चर महाविद्यालयही अनुदान उभे करताना अडचणी येतात. त्यामुळे शासनाने अनुदानित महाविद्यालयांना वाचविण्यासाठी वेगळा विचार करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.>या महाविद्यालयाकडे मोठी शैक्षणिक परंपरा आहे. पूर्वीपासून पुण्यात हे एकमेव अनुदानित आर्किटेक्चर कॉलेज आहे. तेही बंद झाले तर गरीब विद्यार्थी शिक्षणच घेऊ शकणार नाहीत. हे महाविद्यालय बंद झाल्यास केवळ धनदांडग्यांनाच आर्किटेक्चरचे शिक्षण घेता येईल. त्यामुळे हे महाविद्यालय बंद होऊ नये, ही आम्हा माजी विद्यार्थ्यांची इच्छा आहे. कौन्सिलच्या अटी पूर्ण करण्यात महाविद्यालय कमी पडत असले तरी महाविद्यालयाची गुणवत्ता जराही घसरली नाही हे विसरून चालणार नाही.- माधव जोशी, आर्किटेक्चर व माजी विद्यार्थी>केवळ या कॉलेजमुळे माझ्यासह अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता आले. वीटभट्टी कामगाराचा मुलगा येथून पदवीधर होत आहे. पण संस्थेच्या दुर्लक्षामुळे कॉलेज बंद होत असल्याचे दु:ख होत आहे. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी कॉलेजच्या मागे खंबीरपणे उभे राहण्यास तयार आहे. महाविद्यालय बंद झाले तर गरीब गरजू विद्यार्थ्यांचे नुकसान होईलच, परंतु गुणवंत विद्यार्थी बाहेर येण्याचे थांबल्याने आर्किटेक्चर क्षेत्राचेसुद्धा मोठे नुकसान होईल, हे विसरून चालणार नाही.- माधव हुंडेकर, आर्किटेक्चर व माजी विद्यार्थी