रूपेश उत्तरवार, यवतमाळराज्यभरात शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. पूर्वी ही पदे तोंडी आकडेवारीच्या आधारे भरली जात होती. चुकीची माहिती कळविली जात होती. पटसंख्या ग्राह्य धरून शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापकांची पदे भरली जातील, अशी माहिती शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाकरिता ते यवतमाळात आले होते. शिक्षकांच्या पदभरतीकरिता विशेष पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. यामध्ये शिक्षण परिषद वर्षात दोन वेळा शिक्षकांची परीक्षा घेणार असून त्यात उत्तीर्ण झालेले उमेदवार तीन वर्षे पात्र राहतील व मेरिट लिस्टनुसार त्यांची रिक्त जागी नियुक्ती केली जाईल. ही परीक्षा आॅनलाइन असेल. परीक्षा संपताच त्याच ठिकाणी गुण जाहीर होतील. त्यामुळे गैरप्रकाराला वाव राहणार नाही, असे ते म्हणाले. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर शिक्षणाच्या मुख्य कामासोबत १५० अशैक्षणिक कामांचे ओझे टाकण्यात आले आहे. यामध्ये शालेय पोषण आहाराचाही समावेश आहे. तथापि, ही कामे काढून घेतली जाणार आहेत. यासोबतच गरज असेल तरच प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘सरल’च्या माध्यमातून राज्यात शिक्षक पदभरती
By admin | Updated: November 11, 2015 02:39 IST