शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

होलोग्रामच्या माध्यमातून शासनाला ५ हजार कोटींचा लाभ होईल - एकनाथराव खडसे यांचा दावा

By admin | Updated: August 21, 2016 18:35 IST

होलोग्रामचा वापर करण्यासाठीचे कंत्राट मुख्यमंत्र्यांनी रद्द केले नसून ते तांत्रिक दुरुस्ती आणि त्याची जागतिक निविदा प्रसिद्ध करण्याबाबत विचार सुरु

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. २१ : बनावट मद्याची विक्री रोखण्यासाठी राज्य शासनातर्फे बाटलीवर होलोग्रामचा वापर करण्यासाठीचे कंत्राट मुख्यमंत्र्यांनी रद्द केले नसून ते तांत्रिक दुरुस्ती आणि त्याची जागतिक निविदा प्रसिद्ध करण्याबाबत विचार सुरु असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी रविवारी जळगाव येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.

शासनाला ५ हजार कोटींचा फायदाते म्हणाले, बनावट मद्याची विक्री रोखण्यासाठी उत्पादन शुल्क मंत्री असताना मद्याच्या बाटलीवर होलोग्राम लावण्याचा निर्णय घेतला होता. परवानाधारक मद्यप्राशन करणाऱ्या इसमाला होलोग्रामद्वारे बनावट मद्य ओळखण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान मोफत देणार होतो. या माध्यमातून मद्याचा काळाबाजार थांबून शासनाच्या तिजोरीत वार्षिक ५ हजार कोटींच्या उत्पन्नाची भर पडणार आहे.

शासनाला एक रुपयाचा खर्च नाहीहोलोग्राम तयार करणारा ठेकेदार व मद्य उत्पादन करणारी कंपनी यांच्यात हा व्यवहार होणार आहे. संबधित ठेकेदाराने मागणीनुसार होलोग्राम तयार करून मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीला ते पुरवायचे आहे. त्याबदल्यात येणारा खर्च हा संबधित ठेकेदाराने मद्य उत्पादन करणाऱ्या कंपनीमालकाकडून घ्यायचा आहे. मात्र हे तंत्रज्ञान वापराचे जे निकष आहे त्याचे कंत्राट शासनातर्फे काढण्यात आले आहे. यासाऱ्यात शासनाला एक रुपया द्यायचा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.बनावट मद्याचा काळाबाजार रोखण्यासाठी होलोग्राम तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसह आपण सुरुवातीपासून आग्रही आहोत. त्या संदर्भात दोन वेळा मंत्रालयात सादरीकरण करण्यात येऊन मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात आली होती. हे कंत्राट देशस्तरावर आहे. आता जागतिकस्तरावर निविदा प्रसिद्ध करण्याबाबत तसेच या कंत्राटामध्ये काही तांत्रिक त्रुटी आहे त्या दूर करण्याबाबत शासनाचा विचार सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मीडिया ट्रायल अजून संपलेली नाहीबनावट मद्य रोखण्यासाठी होलोग्राम तंत्रज्ञानाच्या संदर्भात ही वस्तुस्थिती असताना हजार कोटींचे कंत्राट रद्द केल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे आपल्याबाबत सुरु असलेली मीडिया ट्रायल अजून संपलेले नाही. मद्याच्या बाटलीवर होलोग्राम बसल्यामुळे बनावट दारूचा काळाबाजार बंद होऊन अनेकांना फटका बसणार आहे. त्यामुळे यासाऱ्यातून दिशाभूल करण्याचे प्रकार सुरु असल्याचे खडसे म्हणाले.