शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमीयुगुलांना उद्ध्वस्त करणाऱ्या टोळ्या सक्रिय

By admin | Updated: December 4, 2014 00:48 IST

शहराबाहेर सामसूम रस्त्यांवर गुन्हेगारांच्या टोळ्या प्रेमीयुगुलांना उद्ध्वस्त करीत आहेत. बदनामीच्या भीतीने या टोळ्यांच्या कृत्यांवर आपोआप पडदा पडत आहे. कळमना भागात घडलेल्या एका शिक्षिकेवरील

नराधम अंधारातच : शिक्षिकेवर सामूहिक बलात्कारानंतर भयावह वास्तव उजेडातराहुल अवसरे - नागपूरशहराबाहेर सामसूम रस्त्यांवर गुन्हेगारांच्या टोळ्या प्रेमीयुगुलांना उद्ध्वस्त करीत आहेत. बदनामीच्या भीतीने या टोळ्यांच्या कृत्यांवर आपोआप पडदा पडत आहे. कळमना भागात घडलेल्या एका शिक्षिकेवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेला ४८ तास लोटले. परंतु अद्यापही आरोपी गवसले नाहीत. हे घृणित कृत्य याच टोळीचे असावे, अशी शंका व्यक्त केली जात आहे. १ डिसेंबरच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास मोटरसायकलींवर असलेल्या पाच नराधमांनी स्वत:ला पोलीस असल्याचे सांगून कापसी उड्डाण पुलावरून आपल्या प्रियकरासोबत येत असलेल्या शिक्षिकेला पळवून नेऊन सामूहिक बलात्कार केला. लपवा-छपवीचे प्रेम मोबाईल फोन उपलब्ध झाल्यापासून प्रेमप्रकरणे फुलू लागली आहेत. प्रेमसंबंध घरच्यांना अंधारात ठेवून केले जात आहेत. प्रेमीयुगुले एकांतवास मिळावा म्हणून शहराबाहेरील निर्जन ठिकाणे शोधतात. तोंडाला फडके बांधलेली ही युगुले मोटारसायकलींवर मोठ्या प्रमाणावर एकांताच्या शोधात ‘हाय-वे’वर नजरेस पडतात. कुण्या ओळखीच्या व्यक्तीला आपण दिसू नये, आपले प्रेम घरच्या लोकांना माहीत होऊ नये, यासाठीच तोंडाला फडके बांधून ते स्वत:ची ओळख लपवतात. केवळ बदनामीची भीतीयुगुले आपापल्या कुटुंबाला माहीत होऊ न देता प्रेम करतात याची जाणीव या टोळीला असते. त्यामुळेच दररोज किमान दोन युगुले या टोळ्यांची शिकार होतात. उद्ध्वस्त प्रेमीयुगुलाने पोलिसात तक्रार केलीच तर केवळ जबरीचोरीचा गुन्हा दाखल होतो. कारण पीडित तरुणी केवळ बदनामीच्या भीतीने मुद्दाम बलात्काराच्या घटनेला अंधारात ठेवत असते.शहरात अशा तीन-चार टोळ्या सक्रिय आहेत. एका टोळीचा म्होरक्या अफरोज याला २०१२ मध्ये एका खुनाच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. आता तो उच्च न्यायालयातून निर्दोष सुटला आहे. अन् टोळ्या घेतात गैरफायदालपून-छपून केल्या जाणाऱ्या प्रेमसंबंधांचा सक्रिय झालेल्या गुन्हेगारी टोळ्या गैरफायदा घेत आहेत. गुन्हेगारांच्या या टोळ्या शिकाऱ्याप्रमाणेच प्रेमीयुगुलांच्या मागावरच असतात. प्रत्येक टोळीत चार ते पाच सदस्य असतात. त्यांच्याजवळ चोरीच्या मोटारसायकली असतात. नंबर प्लेट बदललेली असते. सामसूम ठिकाणी घेराबंदी करून टोळीतील माणसे लफडेवाले है असे म्हणत प्रेमीयुगुलांवर झडप घेतात. स्वत:ला पोलीस सांगत युगुलांना दाट झाडीत घेऊन जातात. जीवाच्या भीतीने कुणी ओरडतही नाही. आधी दोघांचीही झडती घेऊन मोबाईल, घड्याळ, पैसे, सोन्याचे दागिने हिसकावून घेतात. त्यानंतर असहाय प्रेयसी प्रियकराच्या डोळ्यादेखत या टोळीच्या वासनेला बळी पडते. तिच्यावर सामूहिक बलात्कार होतो. ही टोळी प्रियकरावर दबाव टाकून त्याला प्रेयसीवर बलात्कार करायला लावते. त्याने तसे केले नाही तर अमानवीपणे त्याला मारहाण केली जाते. प्रेमीयुगुलांचे नाव व पत्ते घेऊन अटक करून बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांना सोडून देतात. तरुणीवर बलात्कार अन् प्रियकराचा खूनअफरोजच्या टोळीने १६ जून २००५ रोजी शिवणगावनजीकच्या कलकुही येथील अशुकामाशुका दर्ग्याच्या परिसरात बसलेल्या एका प्रेमीयुगुलाला पकडले होते.प्रियकर हा उमरेड मार्गावरील एका बारचा संचालक होता. तो विवाहित असूनही त्याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. या तरुणीचाही अन्य दुसऱ्यासोबत विवाह जुळला होता. अफरोजच्या टोळीने या दोघांना दाट झाडीत नेऊन त्यांच्याजवळील किमती वस्तू व पैसे हिसकावून घेतले होते. टोळीने स्वत:पुढेच प्रियकराला प्रेयसीसोबत संबंध करण्यास सांगितले. नकार देताच त्याला मारहाण केली. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न करताच टोळीतील सदस्यांनी त्याचा निर्घृण खून केला. नराधमांनी तरुणीला रात्रभर ओलीस ठेवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सोनेगाव पोलिसांनी खुनाचे प्रकरण उजेडात आणत पीडित तरुणीलाही त्यांनी हुडकून काढले होते. केवळ बदनामीमुळे तिने स्वत:सोबत घडलेल्या प्रसंगाची वाच्यता केली नव्हती.