शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

थरारक ! वाळू माफियाने २ तलाठ्यांचे अपहरण करून त्यांना धावत्या टिपरमधून ढकलले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 16:43 IST

जप्त केलेले वाळूचे टिपर राजूर येथून तहसील कार्यालयात घेऊन जात असलेल्या २ तलाठ्यांचे वाळू माफियांनी अपहरण केले व त्यांना धावत्या गाडीतून ढकलत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी ८ च्या दरम्यान जवखेडा ठोंबरे जवळ झालेल्या या थरारक घटनेत दोन्ही तलाठी सुख्ररूप आहेत. याप्रकरणी भोकरदन पोलिसांनी चालक सर्जेराव चव्हाण याला ताब्यात घेऊन त्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

भोकरदन ( जालना ) , दि. 24 : जप्त केलेले वाळूचे टिपर राजूर येथून तहसील कार्यालयात घेऊन जात असलेल्या २ तलाठ्यांचे वाळू माफियांनी अपहरण केले व त्यांना धावत्या गाडीतून ढकलत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी ८ च्या दरम्यान जवखेडा ठोंबरे जवळ झालेल्या या थरारक घटनेत दोन्ही तलाठी सुख्ररूप आहेत. याप्रकरणी भोकरदन पोलिसांनी चालक सर्जेराव चव्हाण याला ताब्यात घेऊन त्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

या बाबत भोकरदन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तहसीलदार संगीता कोल्हे यांच्या पथकाने आज सकाळी ७ च्या सुमारास अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केली. यात राजूर येथील चौफुलीवर त्यांनी एका टिप्परला ( एमएच २० बीटी १९२५ ) ३ ब्रास अवैध वाळूची वाहतूक करताना पकडले. यावेळी तलाठी भागवत जाधव व रामेश्वर कांबळे हे जप्त केलेल्या टिप्परला पुढील वर कारवाईसाठी चालकासह भोकरदन येथे घेऊन निघाले. काही अंतरावर अचानक एका जीपने टीपरचा रस्ता अडवला व त्यामधून आलेल्या व्यक्तीने दोन्ही तलाठ्यांना जीवे मारण्याची धमकी देत खाली उतरण्यास सांगितले. यावर दोन्ही तलाठी धमकीला न जुमानता  टीपरमध्येच बसून राहिले. यामुळे संतापलेल्या त्या व्यक्तीने चालकाला खाली उतरवत टिपरचा ताबा घेतला व भरधाव वेगात टिपरला बरंजळा रोडवर नेले. या दरम्यान तहसीलदार कोल्हे यांचे पथक टिपर मागेच असल्याने त्यांनी हा प्रकार पाहून भोकरदन पोलिसांना मदत मागीतली.

यानंतर या चालकाने  टिपर भरधाव वेगात चालवत जवखेडा ठोंबरे या गावाजवळ एका बाईक स्वारास हूल दिली, पुढे एका मुलीला व बैलगाडीला उडवण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान टिपरमधील वाळू रस्तावर टाकत चालकाने वेग अधिक वाढवला. दरम्यान, दोन्ही तलाठ्यांनी मोबाईल वरून तहसीलदार कोल्हे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता चालकाने त्यांना शिवीगाळ करत, मी टिपर खड्ड्यात घालून उडी मारेल व तुम्हाला जीव मारेल, तुमच्या तहसीलदारांनाही जीवे मारेल अशी धमकी दिली. यासोबतच त्यांना टिपर मधून खाली ढकलण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोघांनी प्रसंगावधान राखत शिताफीने जीव वाचवला.

ग्रामस्थांच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण हा सर्व प्रकार बालाजी लोखंडे या ग्रामस्थाने पाहिला असता त्याने जवखेडा गावच्या ग्रामस्थांना सावध करत टिपरला अडवण्यास सांगितले. ग्रामस्थांनी रस्त्यावर उभे राहत टिपरला थांबण्यास सांगितले असता चालकाने टिपर त्यांच्यावर घातले.परंतु , ग्रामस्थांनी रस्त्यावर दगड टाकलेले असल्याने टिपर पुढे जाऊ शकला नाही. यानंतर कोल्हे यांची गाडी हि पाठलाग करत तिथे पोहोंचली. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने चालकाला ताब्यात घेतले व त्याच वेळी पोहचलेल्या  सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.एस. सिरसाट यांच्या पथकाच्या स्वाधीन केले. यानंतर चालक सर्जेराव चव्हाण ( रा. मानदेऊळगाव ता. बदनापुर ) याला भोकरदन पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. तहसीलदार कोल्हे यांच्या फिर्यादीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.एस. सिरसाट हे करत आहेत.