शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

दरोडखोरांच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

By admin | Updated: April 25, 2017 10:50 IST

पुण्याजवळील धामणे येथे शेतातील पडाळीवर शस्त्रांसहीत आलेल्या दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

 ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 25 - पुण्याजवळील धामणे येथे शेतातील पडाळीवर शस्त्रांसहीत आलेल्या दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत वारकरी संप्रदयातील ज्येष्ठ टाळकरी, त्यांची पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला. तर या हल्ल्यात सून गंभीर जखमी झाली असून दोन नाती सुदैवाने वाचल्या आहेत. यातील  एक जण किरकोळ जखमी आहे.
 
या घटनेमुळे मावळ तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. 
मावळ तालुक्यातील सोमाटणे फाट्याजवळील धामणे या गावात मंगळवार(25 एप्रिल) पहाटे ही घटना घडली. नथू विठोबा फाले (वय 65), छबाबाई नथू फाले (वय 60), अत्रीनंदन ऊर्फ आबा नथू फाले (वय 30) अशी दरोडेखोरांच्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. या घटनेत नथू फाले यांची सून तेजश्री अत्रीनंदन फाले(वय25) ही गंभीर जखमी झाली आहे.
 
अंजली अत्रीनंदन फाले(वय6)  ही नात  किरकोळ जखमी आहे. दरोडेखोरांनी डोक्यात टिकावाचे घाव घालून तिघांची निर्घृण हत्या केली. यामुळे धामणे गाव व पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.
 
नथू फाले हे मावळ तालुक्यातील ज्येष्ठ टाळकरी होते. हभप फालेमामा या नावाने ते सांप्रदायिक क्षेत्रात ओळखले जात.  ते ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक होते. तालुक्यातील प्रत्येक हरिनाम सप्ताहात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा.  त्यांच्या कुटुंबावरील या हल्ल्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
 
जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक मुगुट पाटील , वरीष्ठ अधिकारी,श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.  पोलीस निरीक्षक मुगुट पाटील यांनी  दरोड्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. 
 
नथू फाले यांची धामणे गावच्या शिवारात शेतात पडाळ आहे. ज्यावेळी घटना घडली तेव्हा घरात एकूण सात माणसे होती. दरोडे खोरांच्या हल्ल्यात अनुश्री  व ईश्वरी या दोन्ही नाती सुदैवाने बचावल्या.
 
दरम्यान,धामणे गावात मंगळवारी पहाटे दोन तीन ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती पुढे येत आहे.
 
 
 
(वार्ताहर)