शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

पोलिसांना ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दारूविक्रेत्यांना तीन वर्षांचा कारावास

By admin | Updated: August 18, 2016 16:20 IST

पोलिसांच्या अंगावर वाहन चालवून त्यांना ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गडचिरोली येथील दोन दारुविक्रेत्यांना न्यायालयाने प्रत्येकी ३ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे

जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय : पोलीस वाहनाला दिली होती धडकगडचिरोली : दारुची अवैध वाहतूक करताना अटकाव करणाऱ्या पोलिसांच्या अंगावर वाहन चालवून त्यांना ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गडचिरोली येथील दोन दारुविक्रेत्यांना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रत्येकी ३ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अर्जुन अरुण शिल व राजू विठ्ठल कंटकवार अशी दोषी इसमांची नावे आहेत.२३ सप्टेंबर २०१० रोजी आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी.बी.माने हे आपल्या सहकाऱ्यांसह आरमोरी-ब्रह्मपुरी मार्गावरील वैनगंगा नदीजवळ गस्त घालत होते. यावेळी त्यांना ब्रह्मपुरीकडून मारुती ८०० हे वाहन भरधाव वेगाने येताना दिसले. संशय आल्याने पोलिसांनी पाठलाग करुन मारुती कार थांबविण्याचा प्रयत्न केला.

परंतु चालक कार पुढे घेऊन गेला. त्यानंतर पोलिसांनी आपले वाहन मारुती कारसमोर नेऊन कार पुन्हा थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी पोलिसांच्या वाहनाला धडक दिली. यामुळे दोन्ही वाहने उलटली. काही वेळानंतर पोलीस उपनिरीक्षक विजय देशमुख यांनी घटनास्थळी येऊन नागरिकांच्या सहकार्याने दोन्ही वाहने सरळ केली. यावेळी मारुती कारमध्ये २० पेट्या देशी दारु आढळून आली. शिवाय कारमधील अर्जुन शिल व राजू कंटकवार हे जखमी झालेले दिसले. पोलिसांनी दारु ताब्यात घेऊन दोन्ही जखमींना रुग्णालयात भरती केले. त्यानंतर शिपाई नरेंद्र बांबोळे यांच्या फियार्दीवरुन पोलीस उपनिरीक्षक विजय देशमुख यांनी दोन्ही आरोपींवर भादंवि कलम ३०७, ३५३, ३३२, ४२७, ३४ व मुंबई दारुबंदी कायद्याच्या कलम ६५ (ड), ८३ अन्वये गुन्हे दाखल केले.

पुढे हे प्रकरण न्यायालयात वर्ग करण्यात आले. बुधवारी १७ आॅगस्ट रोजी या प्रकरणाचा निकाल लागला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी सर्व साक्ष व पुरावे तपासून आरोपी अर्जुन शिल व राजू कंटकवार यांना भादंवि कलम ३५३ अन्वये ३ वर्षे सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास दोन महिन्यांची अतिरिक्त शिक्षा आणि मुंदाका कलम ६५ (१) (ड) अन्वये २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व पाचशे रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवसांची अतिरिक्त शिक्षा, मुंदाका कलम ८३ अन्वये २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व पाचशे रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवसांची अतिरिक्त शिक्षा ठोठावली.

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे व पोलीस नाईक अरविंद पेंदाम यांनी जबाबदारी सांभाळली.