शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

लातूरमध्ये खड्ड्यांमुळे तीन महिलांची रस्त्यातच प्रसूती

By admin | Updated: May 18, 2015 03:41 IST

सीमावर्ती भागातील लातूर-बीदर रोड ते तगरखेडा या रस्त्याची गेल्या दोन वर्षांपासून दुरवस्था झाली असून खड्ड्यांमुळे गेल्या आठवड्यात तीन महिलांची रस्त्यातच प्रसूती झाल्याची घटना घडली आहे़

बालाजी थेटे, औराद शहाजानी (जि. लातूर)सीमावर्ती भागातील लातूर-बीदर रोड ते तगरखेडा या रस्त्याची गेल्या दोन वर्षांपासून दुरवस्था झाली असून खड्ड्यांमुळे गेल्या आठवड्यात तीन महिलांची रस्त्यातच प्रसूती झाल्याची घटना घडली आहे़ गेल्या आठवड्यात तुगाव येथील तीन गरोदर महिला बाळंतपणासाठी औराद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे खासगी वाहनातून जात असताना वाटेतच त्या प्रसूत झाल्या़ सुदैवाने त्यांच्या जीवाला धोका पोहोचला नाही. नादुरुस्त रस्त्यामुळे वाहन सावकाश चालवले तरीही महिला बाळंत झाल्याचे वाहनचालक सतीश मिरकले यांनी सांगितले. मात्र संबंधित तीन महिलांचे घरी बाळंतपण झाल्याची नोंद त्यांच्या नातेवाइकांनी केल्याचे औराद आरोग्य केंद्राचे डॉ़ ज्ञानेश्वर कदम यांनी सांगितले़ तर सध्या तगरखेडा ते हालसी या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे़, असे उपअभियंता डी़ के. पाटील यांनी सांगितले़ जागोजागी खड्डे पडल्याने काही ठिकाणी वाहतूकच बंद पडली आहे़ या रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून लातूर-बीदर रोड ते तगरखेडा हा रस्ता वापरला जातो़ परंतु गेल्या दोन वर्षांपासून त्याचीही अवस्था वाईट झाली आहे़ रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत़ पावसाळ्यात तर खड्ड्यात पाणी साचल्यामुळे अपघात होतात.खराब रस्त्यांमुळे या मार्गावर कर्नाटक महामंडळाची एकच बस येथे धावत आहे, तर राज्य परिवहनची एकच फेरी होत आहे़