सूत्रंची माहिती : शपथविधी सोहळ्यासाठी पोलिसांची तयारी सुरू
मुंबई : नव्या सरकारचा वानखेडे स्टेडियमवर होऊ घातलेल्या शपथविधी सोहळा सुरक्षितपणो पार पडावा, यासाठी मुंबई पोलीस रणनीती आखत आहेत. सूत्रंकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्टेडियमभोवती त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवली जाईल.
31 ऑक्टोबर रोजी हा शपथविधी होण्याची शक्यता आहे. या सोहळय़ाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून विविध क्षेत्रंतील मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. उपस्थितांपैकी बहुतांश अतिमहत्त्वाच्या, महत्त्वाच्या व्यक्ती असतील. मुंबई पोलिसांच्या अंदाजानुसार या सोहळय़ाला 3क् ते 35 हजार पाहुणो येऊ शकतील. हे सर्व लक्षात घेऊन मुंबई पोलीस या शपथविधी सोहळय़ाच्या सुरक्षेसाठी रणनीती आखत आहेत. सूत्रंकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सोहळय़ासाठी कोणाकोणाला आमंत्रण आहे त्याची यादी शासनाच्या सर्वसाधारण प्रशासकीय विभागाकडून पोलिसांना मिळेल. त्यात महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा सहभाग असेल. त्या यादीनुसार आमंत्रितांनाच स्टेडियममध्ये सोडण्यात यावे, याकडे वरिष्ठ अधिका:यांचा कल आहे.
स्टेडियममध्ये पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. या कॅमे:यांचे चित्रण नियंत्रण कक्षात असून, त्यावर बंदोबस्तावरील जबाबदार अधिका:यांची करडी नजर असेल. स्टेडियमभोवतीचा परीघ निर्मनुष्य करून तेथे आमंत्रितांची मेटल डिटेक्टरमधून पहिली झाडाझडती होईल. स्टेडियममध्ये प्रत्येक ठिकाणी सशस्त्र कमांडो तैनात असतील. सोहळ्याआधी संपूर्ण स्टेडियमची अॅन्टी सॅबोटॅज पथक व बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून चाचपणी केली जाईल. तसेच सुरक्षा व्यवस्थेची रंगीत तालीमही घेतली जाईल, असे समजते.