शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना त्रिस्तरीय वेतनश्रेणीचा लाभ

By admin | Updated: April 11, 2017 01:45 IST

राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना, गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या सुधारित त्रिस्तरीय वेतनश्रेणीचा लाभ

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना, गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या सुधारित त्रिस्तरीय वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे. यासाठी ग्रामविकास विभागाने परिपत्रक जारी केले असून, त्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक त्रिस्तरीय वेतनश्रेणीपासून अनेक वर्षांपासन वंचित होते. विधान परिषदेत विविध माध्यमातून यासंदर्भात चर्चा घडवल्याचे माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना त्रिस्तरीय वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी केली होती. मात्र, जलसंधारण, ग्रामविकास आणि शालेय शिक्षण विभागात ताळमेळ नसल्याने, मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. यासंदर्भात विविध निर्णय होऊनही त्रिस्तरीय सुधारित वेतनश्रेणीची अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे ग्रामविकास विभागाने परिपत्रक काढून १ जानेवारी १९९६पासून काल्पनिक वेतनवाढ देऊन, त्याचा प्रत्यक्ष लाभ हा १ मार्च २०१४पासून लागू करण्यासाठी मान्यता दिली. शालेय शिक्षण विभागाने या सुधारित त्रिस्तरीय वेतनश्रेणीसाठी आर्थिक तरतूद करावी, असेही या आदेशात म्हटले आहे. याचा लाभ राज्यातील लाखो शिक्षकांना होणार असल्याची माहिती मोते यांनी दिली. (प्रतिनिधी)निर्णयात बदलशालेय शिक्षण विभागाने २६ फेब्रुवारी २०१४ रोजी नवा निर्णय जाहीर केला. या निर्णयात ३ जून २००० सालच्या निर्णयात बदल करण्यात आला. या निर्णयानुसार सुधारित त्रिस्तरीय वेतनश्रेणी ही १ जानेवारी १९९६पासून लागू करण्याच्या निर्णयात बदल करून, लाभ १ मार्च २०१४पासून देण्याचा निर्णय झाला. याचा फायदा लाखो शिक्षकांना होईल.