शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

तीन भावंडांना जलसमाधी; माता बालंबाल बचावली

By admin | Updated: October 9, 2016 13:51 IST

जिल्ह्यात चोवीस तासात दोन वेगवगळ्या घटनांत कपडे धुताना पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू झाला. तालुक्यातील कामखेडा तीन भावंडांना जलसमाधी मिळाली.

ऑनलाइन लोकमतबीड, दि. ९ : जिल्ह्यात चोवीस तासात दोन वेगवगळ्या घटनांत कपडे धुताना पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू झाला. तालुक्यातील कामखेडा तीन भावंडांना जलसमाधी मिळाली. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे या मुलांची आई बालंबाल बाचवली. अंबाजोगाई तालुक्यात एका महिलेचा बुडून मृत्यू झाला.शेख जिशान शेख इसाक (१५), शेख सानिया शेख इसाक (१३), शेख अफ्फान शेख इसाक (११ रा. कामखेडा ता. बीड) अशी मयत भावंडांची नावे आहेत. ते आई परवीन शेख यांच्यासोबत रविवारी सकाळी दहा वाजता गावाजवळील बंधाऱ्यावर कपडे धुण्याकरता गेले होते. बंधारा भरुन वाहिल्याने काठोकाठ पाणी साचलेले होते. कपडे धुताना शेख जिशानचा पाय घसरला व तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी बहीण सानिया पुढे झाली. ती देखील पाण्यात पडली. त्या दोघांनाही वाचविण्याकरता अफ्फान पाण्यात उतरला. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिघेही बुडू लागले.

एवढ्यात तेथून एक महिला शेतात जात होती. तिने तीन मुले बुडत असल्याची माहिती मोबाईलवरुन गावात कळविली. यावेळी परवीनने तिन्ही मुलांना वाचिण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र त्या देखील बुडू लागल्या. तोवर गावातील तरुण तेथे पोहोचले होते. शेकडो तरुणांनी  शर्थीचे प्रयत्न करुन शेख जिशान, शेख सानिया यांच्यासह माता परवीन यांना पाण्याबाहेर काढले. जिशान व सानिया यांच्या नाका- तोंडात पाणी गेल्याने त अत्यवस्थ होते. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले;परंतु त्या दोघांनाही डॉक्टरांनी मयत घोषित केले. शेख अफ्फान हा तळाला गेला होता. त्यामुळे त्याला पाण्याबाहेर काढण्यास विलंब लागला. अर्ध्या तासानंतर त्याचे प्रेत तरुणांनी बाहेर काढले. शेख इसाक हे शेती करतात. कापूस खरेदी-विक्रीचाही त्यांचा व्यवसाय आहे. त्यांची तिन्ही मुले पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडल्याने त्यांना धक्का बसला आहे. शेख इसाक व शेख परवीन या दाम्पत्यावर उपचार सुरु आहेत.नातेवाईकांचा टाहोएकाचवेळी तीन भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याने नातेवाईकांची जिल्हा रुग्णालयात गर्दी झाली होती. सामाजिक कार्यकर्त्यांनीही नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले. अश्रू व हुंदक्यांनी रुग्णालय परिसर सून्न झाला होता. गावावरही शोककळा पसरली आहे.जिल्हा रुग्णालयात गोंधळतीन मुलांच्या मृत्यूनंतरही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे फिरकलेही नाहीत. या हलगर्जीबद्दल नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यामुळे सुरुवातीला तिन्ही मृतदेह ताब्यात घेणार नाहीत, असा पावित्रा नातेवाईकांनी घेतला. मात्र, सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्तीने तणाव निवळला. यावेळी पोलीस बंदोबस्तही तैनात होता.अंबाजोगाई तालुक्यात महिलेचा मृत्यूधायगुडा पिंपळा (ता. अंबाजोगाई) येथे धुणे धुण्यासाठी तळ्यावर गेलेल्या महिलेचा रविवारी सकाळी ९ वाजता पाय घसरुन पडल्याने बुडून मृत्यू झाला. शांताबाई धर्मराज धायगुडे (४५) असे मयत महिलेचे नाव आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे