शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

नदीत बुडून तीन भावंडांचा मृत्यू

By admin | Updated: August 8, 2016 20:22 IST

नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी तीन वाजता तालुक्यातील तडोळा येथे घडली. मृतांत दोन सख्ख्या भावंडांचा समावेश

ऑनलाइन लोकमत
 
बीड, दि.  -  नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी तीन वाजता तालुक्यातील तडोळा येथे घडली. मृतांत दोन सख्ख्या भावंडांचा समावेश असून तिसरा चुलतभाऊ आहे. अजय बाळासाहेब अडसूळ (१४) वैभव महादेव अडसूळ (१२) विकास महादेव अडसूळ (९ सर्व रा. तडोळा) यांचा मृतांत समावेश आहे.
  हे तिघे एकाच कुटुंबातील असून गावातीलच जि.प. शाळेत शिकत होते. श्रावणी सोमवारमुळे दुपारपर्यंतच शाळा होती. दुपारी दोन वाजता ते शाळेतून परतले. जेवण करुन ते पोहण्यासाठी घराबाहेर पडले. गावाजवळील वांजरा नदीवर पोहण्याचा त्यांनी बेत आखला. तिघांनाही पोहता येत होते; परंतु नदीपात्रात गेल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. नदीतून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा झाल्याने नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. पोहताना हे तिघेही मोठ्या खड्ड्यातील गाळात अडकल्याने त्यांना बाहेर निघता न आल्याने तिघांचा बुडून मृत्यू झाला. पोहायला गेलेली मुले बराच वेळ घरी न परतल्याने शोधाशोध सुरू झाली.  नदीवर जाताच एक मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. ही माहिती गावात वाºयासारखी पसरताच ग्रामस्थांनी नदीकाठी गर्दी केली. बुडालेल्या तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. 
 उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार शरद झाडके , निरीक्षक सुरेंद्र गंदम यांनी घटनास्थळी भेट दिली. तिन्ही मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी स्वाराती रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले. 
 
नातेवाईकांचा टाहो!
तिन्ही मुले एकाच कुटुंबातील असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. महादेव अडसूळ यांची वैभव व विकास ही दोन्ही मुले एकाच वेळी बुडाल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्वाराती रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी एकच टाहो फोडला.