शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

महापालिकेचे तीन वरिष्ठ अधिकारी गजाआड

By admin | Updated: October 21, 2014 03:38 IST

बांधकाम व्यावसायिकाकडून १५ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) मुंबई महापालिकेतील इमारत प्रस्ताव विभागाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण पाच जणांना गजाआड केले.

मुंबई : बांधकाम व्यावसायिकाकडून १५ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) मुंबई महापालिकेतील इमारत प्रस्ताव विभागाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण पाच जणांना गजाआड केले.एसीबीने दिलेल्या माहितीनुसार या व्यावसायिकाला आयओडी (इंटीमेशन आॅफ डीसअ‍ॅप्रुव्हल) प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यासाठी ते पालिकेच्या ई विभाग कार्यालयातील इमारत प्रस्ताव विभागात आले. तेथे त्यांची भेट कार्यकारी अभियंता सुनील राठोड, दुय्यम अभियंता बालाजी बिराजदार आणि सहाय्यक अभियंता विलास खिलारे यांच्यासोबत झाली. आयओडीसाठी या तिघांनी व्यावसायिकाकडे तब्बल २५ लाख रूपयांची लाच मागितली. या व्यावसायिकाने एसीबीकडे तिघांविरोधात तक्रार दिली. एसीबीने तक्रारीतली तत्थता जाणून घेत तात्काळ गुन्हा नोंदवला. काल ई विभाग कार्यालयात सापळा रचण्यात आला.तेव्हा या राठोड, खिलारे आणि बिराजदार यांच्यावतीने वास्तुरचनाकार सतीश पालव, नारायण पाटील या दोघांनी व्यावसायिकाकडून १५ लाख रूपये घेतले. तेव्हा दबा धरून बसलेल्या एसीबी अधिकाऱ्यांनी या दोघांना रंगेहाथ पकडले. त्या नंतर पालिका अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)