शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लोकलच्या धडकेत तिघे ठार

By admin | Updated: March 12, 2016 04:39 IST

लोकलच्या धडकेत चारवर्षीय चिमुकल्यासह तीन जण ठार झाल्याची घटना जोगेश्वरी ते गोरेगावदरम्यान शुक्रवारी सायंकाळी घडली. रूळ ओलांडत असताना ही घटना घडल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मुंबई : लोकलच्या धडकेत चारवर्षीय चिमुकल्यासह तीन जण ठार झाल्याची घटना जोगेश्वरी ते गोरेगावदरम्यान शुक्रवारी सायंकाळी घडली. रूळ ओलांडत असताना ही घटना घडल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. लोकलची धडक एवढी जोरदार होती की तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची अपघाती नोंद बोरीवली रेल्वे पोलिसांत करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले की, रूळ ओलांडताना हा अपघात झाला आहे. यात तीन जण ठार झाले आहेत. याबाबत अधिक चौकशी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वेचे गँगमन रूळांवरून जात असताना असेच रेल्वेच्या धडकेत ठार झाले होते. (प्रतिनिधी)अपघातात ठार झालेल्यांमध्ये संतोष सडासम (४0), त्याची पत्नी रेणुका (३५) आणि अंशु कोल्हे (४) या तिघांचा समावेश आहे. अंशु कोल्हे हा रेणुकाचा भाचा आहे. जोगेश्वरी येथील ट्रॅकजवळील झोपड्यांमध्ये राहणारे संतोष आणि रेणुका, तिचा भाऊ आणि अंशु हे सायंकाळी साडेचारच्या सुमारास कामानिमित्त गोरेगाव येथे होते. काम उरकल्यानंतर त्यांनी गोरेगाव स्थानकातून लोकल पकडली आणि जोगेश्वरी स्थानकात उतरले. त्यानंतर घरी जाण्यासाठी पादचारी पुलाचा वापर करण्याऐवजी त्यांनी जोगेश्वरी स्थानकाच्या ट्रॅकवरून चालण्याचा निर्णय घेतला. अंशुच्या वडिलांनी काम असल्याचे सांगत त्याला संतोष व रेणुकाकडे सुपुर्द केले व अंशुला घरी सोडण्यास सांगितले. संतोष, रेणुका हे अंशुला घेऊन ट्रॅकवरून चालत पूर्वेकडून पश्चिम दिशेला जात होते. मात्र त्याचवेळी विरारला जाणाऱ्या जलद लोकलचा अंदाज त्यांना आला नाही आणि त्यांना धडक बसली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.