शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या शिकारप्रकरणी आंतरराष्ट्रीय तस्करासह तिघांना कारावास

By admin | Updated: August 13, 2016 00:44 IST

आकोट न्यायालयाचा निकाल; मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत खिरकुंड येथे वाघाची शिकार प्रकरण.

आकोट (जि. अकोला), दि. १२ : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत खिरकुंड येथे वाघाची शिकार केल्याप्रकरणी आकोट न्यायालयाने १२ ऑगस्ट रोजी तीन आरोपींना दोषी ठरवित तीन वर्षांंचा सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. यामध्ये आंतरराष्ट्रीय तस्कर रणजितसिंग भाटिया यांचा समावेश आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प, आकोट वन्य जीव विभागांतर्गत येत असलेल्या खिरकुंड येथे ६ ऑगस्ट २0१३ मध्ये वाघाची शिकार करण्यात आली होती. याप्रकरणी आरोपी आरकास, रणजितसिंग भाटिया, ममरू व मीनारबाई यांच्या विरोधात वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ४४, ४९, सोबतच ५१ ए व भादंविच्या २0१ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. उपरोक्त चारही आरोपींना अटकसुद्धा करण्यात आली होती. तपासादरम्यान आरोपी ममरू याने दिलेल्या बयाणात आरकास याने वाघाची शिकार केली व अवयव नष्ट केल्याची कबुली दिली होती. तसेच आरोपी रणजितसिंग भाटिया याने सदर वाघाची चामडी ६ लाख ५0 हजार रुपयांत विकत घेतली होती. रणजितसिंग याच्याकडे वाघाची हाडेसुद्धा सापडली. न्यायालयाच्या आदेशाने सदर हाडे वन्य जीव संस्था डेहराडून येथे तपासणीकरिता पाठविण्यात आली होती, त्यांनी दिलेल्या अहवालात ती हाडे वाघाचीच असल्याचे निष्पन्न झाल्याचे नमूद केले होते. याप्रकरणी तत्कालीन सहायक वनसंरक्षक ए.आर. शेख, वनरक्षक जी.व्ही. उमक, आर.के. अंभारे यांच्या साक्षीपुराव्यानंतर तसेच विविध न्यायालयांच्या निकालाच्या दाखल्यांच्या आधारावर आरोपी दोषी आढळलेत. आकोट न्यायालयाचे प्रथमश्रेणी न्यायाधीश नि.रा. वानखडे यांनी आरोपी आरकास याला तीन वर्ष सश्रम कारावास व २२ हजार रुपये दंड, रणजितसिंग भाटिया यास तीन वर्ष सश्रम कारावास व १0 हजार रुपये दंड व ममरू यास तीन वर्ष सश्रम कारावास व १0 हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावास भोगावा लागेल. या खटल्यात आरोपी मीराबाई हिला पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले. वन्य जीव विभागातर्फे अँड.एम.सी. जेस्वाणी, तर आरोपींतर्फे अँड.आर.बी. कुलकर्णी यांनी काम पाहिले.याप्रकरणी तत्कालीन उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला होता. तत्कालीन तपास अधिकारी तथा नरनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे न्यायालयात उपस्थित होते.