शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

तिघांनाही फाशीच

By admin | Updated: May 10, 2017 03:03 IST

संपूर्ण राज्याला हादरवून सोडलेल्या संगणक अभियंता नयना पुजारी अपहरण, बलात्कार व खून प्रकरणातील तीनही आरोपींना विशेष न्यायाधीश

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : संपूर्ण राज्याला हादरवून सोडलेल्या संगणक अभियंता नयना पुजारी अपहरण, बलात्कार व खून प्रकरणातील तीनही आरोपींना विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. हा भयानक प्रकार ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ असल्याने फाशीची शिक्षा दिल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. माफीचा साक्षीदार राजेश चौधरी याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नयना अभिजित पुजारी (वय २८) या खराडी येथील सेनिक्रॉन प्रा.लि. या सॉफ्टवेअर कंपनीत संगणक अभियंता म्हणून कामास होत्या. त्या ७ आॅक्टोबर २००९ रोजी रात्री आठच्या सुमारास कात्रज येथे घरी जाण्यासाठी खराडी येथील रिलायन्स मार्टजवळील लक्ष्मी हॉस्पिटलजवळच्या बस स्टॉपवर बसची वाट पाहत थांबल्या होत्या. त्या वेळी आरोपी इंडिका कारमधून त्या ठिकाणी आले. त्यांनी नयना यांना हडपसर येथे सोडण्यासाठी प्रवासी म्हणून कारमध्ये घेतले. त्यानंतर नयना यांना वाघोली, तुळापूर, जरेवाडी (ता. खेड) येथे नेऊन सामूहिक बलात्कार करत खून केला. या आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १६ आॅक्टोबर २००९ रोजी अटक केली.सुनावणीदरम्यान राजेश चौधरी हा आरोपी माफीचा साक्षीदार झाला. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी एकूण ३७ साक्षीदार तपासले. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. बी.ए. आलुर यांनी १३ साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षांकडून न्यायालयात अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर आणि न्यायालयास असलेल्या शंकांचेही दोन्ही पक्षांनी निरसन केले. त्यानंतर मंगळवारी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.या गुन्ह्यातील मास्टर माइंड समजला जाणारा योगेश राऊत हा ससून रुग्णालयात दाखल असताना नैसर्गिक विधीच्या बहाण्याने १७ सप्टेंबर २०११ रोजी फरार झाला होता. त्याला तब्बल पावणेदोन वर्षांनंतर पोलिसांच्या विशेष पथकाने पुन्हा पकडले होते. योगेश अशोक राऊत (वय ३२, रा. गोळेगाव, ता. खेड), महेश बाळासाहेब ठाकूर (३१, रा. सोळू, ता. खेड), विश्वास हिंदूराव कदम (३४, रा. दिघीगाव. मूळ भुरकवडी, ता. खटाव, जि. सातारा) अशी फाशीची शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. राजेश पांडूरंग चौधरी (वय ३१, रा. गोळेगाव, ता. खेड) असे मुक्तता केलेल्या माफीच्या साक्षीदाराचे नाव आहे. अपहरण, जबरी चोरी, सामूहिक बलात्कार, खून, मृताच्या शरीरावरील ऐवज चोरणे, कट रचणे अशा सहा गुन्ह्यांखाली तिघांना दोषी ठरवण्यात आले आहे.