शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तीन नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू होणार

By admin | Updated: April 16, 2016 02:36 IST

वैद्यकीय क्षेत्रात उत्तम दर्जाचे डॉक्टर तयार व्हावेत आणि सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या मुलांनाही चांगले वैद्यकीय शिक्षण मिळावे, यासाठी खासगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वातून

मुंबई : वैद्यकीय क्षेत्रात उत्तम दर्जाचे डॉक्टर तयार व्हावेत आणि सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या मुलांनाही चांगले वैद्यकीय शिक्षण मिळावे, यासाठी खासगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वातून वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच बॉम्बे पोर्ट ट्रस्ट, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि आॅईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन या कंपन्यांबरोबर खासगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. त्यात सरकारी रुग्णालयांप्रमाणे शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.परेल येथील वाडिया रुग्णालयाने ९० वर्षे पूर्ण केल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात तावडे बोलत होते. राज्यपाल चे. विद्यासागर राव हेदेखील या वेळी उपस्थिती होते. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत सरकारी महाविद्यालयांप्रमाणे शुल्क आकारल्यास सामान्य घरातील मुलांना त्याचा नक्कीच फायदा होईल. सामान्य कुटुंबातून डॉक्टर निर्माण होण्याची गरज आहे. मुंबईला काही तरी द्यावे, या भावनेतून या महाविद्यालयांची संकल्पना समोर आल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या अधिक जागा निर्माण व्हाव्यात, चांगले शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी टाटा, अंबानी यांच्यासारख्या मोठ्या व्यावसायिकांनी येऊन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा. ही महाविद्यालये सरकारी नियमानुसार चालावीत. तसेच शुल्क पद्धती सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाप्रमाणे असावी, अशी अपेक्षाही तावडे यांनी व्यक्त केली.वाडिया कुटुंबीयांनी गरिबांच्या सेवेसाठी रुग्णालय बांधले होते. आणि त्याचा विस्तारही झाला आहे. वाडिया कुटुंबीयांनी ज्या पद्धतीने रुग्णांची सेवा केली, तशीच पुढेही करणार असल्याचे नस्ली वाडिया यांनी म्हटले. (प्रतिनिधी)कुठे उभारणार वैद्यकीय महाविद्यालये?या कंपन्या वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यासाठी उत्सुक आहेत. बीपीटीच्या वडाळा येथील रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा विचार करत आहे. तर ‘ओएनजीसी’ने वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा शोधण्यास सुरुवात केली असून जेएनपीटी रायगड किंवा उरण या भागात ते वैद्यकीय महाविद्यालय उभारणार आहेत. ‘आवडीच्या रुग्णालयात प्रसूती अधिकार मिळावा’महिलेच्या आयुष्यात गर्भधारणा आणि प्रसूती या दोन अत्यंत महत्त्वाच्या घटना असतात. प्रत्येक महिलेला तिच्या आवडीच्या रुग्णालयात प्रसूतीचा अधिकार मिळाला पाहिजे. यासंदर्भात सरकारने कायदा करावा, तो कायदा मी तत्काळ संमत करेन. असा अधिकार देणारा भारत हा जगातील पहिला देश असेल, अशा शब्दांत राज्यपाल विद्यासागर राव यांनी इच्छा बोलून दाखविली. महिलाकेंद्री आरोग्य व्यवस्थेची अत्यंत आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.