शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञान कंपनीतर्फे तीन महिन्यांची पितृत्व रजा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:14 IST

प्रतिभावान कर्मचाऱ्यांना सोयी-सवलती देण्याची तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांत स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे. सेल्सफोर्स या तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपनीने प्रथमच

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रतिभावान कर्मचाऱ्यांना सोयी-सवलती देण्याची तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांत स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे. सेल्सफोर्स या तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपनीने प्रथमच पालक बनणाऱ्या आपल्या पुरुष कर्मचाऱ्यांना चक्क तीन महिन्यांची पगारी पितृत्व रजा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही सर्वांत मोठी पितृत्व रजा ठरली आहे. अलीकडेच मायक्रोसॉफ्टने ६ आठवड्यांची पितृत्व रजा घोषित केली होती.बाळाचा सांभाळ करण्यासाठी आईशिवाय कुटुंबातील इतर नातेवाइकांना देण्यात येणाऱ्या रजेला ‘सेकंडरी केअरगिव्हर लिव्ह’ अर्थात ‘दुय्यम देखभाल रजा’ असे म्हटले जाते. बाळाच्या पित्याला देण्यात येणारी रजाही याच श्रेणीत येते. या वर्षाच्या सुरुवातीस क्युमिन्स इंडियाने पितृत्व रजेचा कालावधी वाढवून एक महिना केला होता. वस्तू उत्पादन क्षेत्रात देण्यात येणारी ही सर्वांत मोठी पितृत्व रजा ठरली होती. बहुतांश अन्य कंपन्यांत पितृत्व रजेचा कालावधी १0 दिवस ते २ आठवडे या दरम्यान आहे. औद्योगिक क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले की, १२ आठवड्यांच्या पितृत्व रजेमुळे प्रतिभावान कर्मचारी भरतीसाठी कंपनीला फायदा होईल. सेल्सफोर्सचे एक संचालक ज्ञानेश कुमार म्हणाले, कर्मचाऱ्यांसाठी पगारी पितृत्व रजा हा चांगला पर्याय आहे, असा आमचा विश्वास आहे. कर्मचाऱ्यांना सन्मानाने वागविण्याचाही हा एक चांगला पर्याय असल्याचे आम्ही मानतो.संघर्ष टळेल : ज्ञानेश कुमारज्ञानेशकुमार यांनी म्हटले की, बाळाच्या जन्मानंतर पालकांना बाळाजवळ असणे गरजेचे असते. तसेच पैशांचीही गरज असते, अशा काळात बिनपगारी रजा घेणे हे कर्मचाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरते. बाळाच्या जन्मानंतर माता आणि पिता अशा दोघांसाठीही नोकरी आणि जगणे यात संघर्षाचा क्षण येतो. पगारी रजा मिळाल्यामुळे हा संघर्ष टाळता येतो. भारतासारख्या देशात तर पितृत्व रजेबाबत बोलणे अधिक गरजेचे आहे. कारण बाळाची जबाबदारी मातेचीच आहे, असा समज येथे आहे. त्याला धक्का देणे आवश्यक आहे.