शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

तीन मंत्र्यांचे स्टिंग उघड करणार !

By admin | Updated: June 26, 2015 02:38 IST

राज्य सरकारमधील तीन मंत्र्यांचे आम्ही स्टिंग आॅपरेशन केले असून ते पावसाळी अधिवेशनात उघड करणार आहोत, असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे

अहमदनगर/मुंबई : राज्य सरकारमधील तीन मंत्र्यांचे आम्ही स्टिंग आॅपरेशन केले असून ते पावसाळी अधिवेशनात उघड करणार आहोत, असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी गुरुवारी नगरमध्ये केला. तर महिला बालकल्याण विभागातील २०६ कोटी रुपयांच्या खरेदी प्रकरणात मुख्यमंत्री राज्याची दिशाभूल करत असून भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने मंत्री पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. ते म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारच्या कामाला आता कुठे सुरूवात झाली तर घोटाळ्यांची मालिका उघड होत आहे. राज्य सरकारमधील तीन मंत्र्यांच्या भ्रष्ट कारभाराचे स्टिंग करण्यात आले आहे. अधिवेशनात ते उघड करण्यात येईल. मात्र संबंधित मंत्री कोण, स्टिंग कधी केले, यावर बोलण्यास नकार दिला. काँग्रेसने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये १ एप्रिल २०१५ पासून १ कोटीहून अधिक रक्कमेची खरेदी दरपत्रकाप्रमाणे करता येणार नसल्याचे म्हटले आहे. परंतु याच सरकारने २६ नोव्हेंबर २०१४ रोजी ३ लाख रूपयांहून अधिकची खरेदी केवळ ई-निविदेच्या माध्यमातूनच करण्याचे निश्चित केले होते. १८ डिसेंबर २०१४च्या आदेशातही ३ लाखांहून अधिकची खरेदी ई-निविदेतूनच करण्याच्या निर्णयाचा पुनरूच्चार केला आहे. (विशेष प्रतिनिधी)