शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नामांकित ब्रॅण्डचे ३ लाख लिटर भेसळयुक्त दूध जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 05:36 IST

एफडीआयचही कारवाई : मदर डेअरी, दारणा, सारडा, हेरिटेजचा समावेश

-अतुल कुलकर्णी मुंबई : सणासुदीच्या दिवसात भेसळयुक्त दूध मुंबईत येत असल्याची माहिती मिळताच अन्न व औषधी प्रशासन विभागाने कारवाई करत मदर डेअरी, दारणा दूध नाशिक, श्रीरंग किसनलाल सारडा, हेरिटेज फूड लि., अग्रवाल मिल्क प्रॉडक्ट अशा नामांकित ब्रॅण्डचे सुमारे साडे तीन लाख लिटर दूध जप्त केले, तर २० हजार लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले. मुंबईचे प्रवेशद्वार असलेले मुलुंड नाका, दहिसर नाका, मानखुर्द नाका, ऐरोली टोल नाका या ठिकाणी मोहीम राबविण्यात आली.

हेरिटेज फूड लि. ही कंपनी फलटण (जि. सातारा) येथे असून कंपनीचे संचालक हैदराबाद येथे राहातात. रामचंद्र साखवलेकर हे या कंपनीचे व्यवस्थापन पाहातात. वाशी टोल नाक्यावर केलेल्या तपासणीत या कंपनीच्या दुधात स्टार्च आणि अमोनियम सल्फेट आढळून आले. त्यामुळे फलटण येथील कंपनीवर छापा टाकला असता, तेथे १७ लाख रुपयांची १२०० किलो भेसळयुक्त दूधपावडर सापडली.

तुर्भे एमआयडीसीतील प्रभात डेअरीमध्ये मदर्स डेअरीसाठी दूधाचे पॅकिंग केले जात होते. त्या दूधात साखरेसारखे भेसळीचे घटक आढळले. तर नाशिकच्या श्रीरंग किसनलाल सारडा यांच्या दूधात स्टार्च आढळले. अग्रवाल मिल्क भोर जि. पुणे, साईराज मिल्क प्रॉडक्ट राहता, साईराम अहमदनगर, दारणा दूध नाशिक, सूदर्शन मिल्क अ‍ॅग्रो प्रॉडक्ट अहमदनगर, श्रीराम दूध संकलन शिरुर पुणे, ममता डेअरी हिरापूर, लक्ष्मी मिल्क या संस्थांच्या दूधात प्रमाणापेक्षा कमी स्रिग्धांश (एसएनएफ) आणि स्टार्च आढळून आले. स्टार्च वापरणे गुन्हा आहे. स्टार्चयुक्त दूध सतत पिले गेले तर त्यामुळे वजन व कोलेस्ट्रॉलही वाढते. आष्टी तालुका दूध उत्पादक सहकारी संघाच्या दूधातही स्टार्च आढळले.

तपासणीत दुधाच्या पाच ब्रँडचे नमुने कमी दर्जाचे आढळले. त्यामुळे ३ लाख ४४ हजार लिटर दूध जप्त केले तसेच दुधाच्या आठ टँकरमधील दुधात अमोनिआ सल्फेट, शुगर, माल्टोडेक्स्ट्रीन हे घातक पदार्थ आढळले. त्यामुळे हे १९ हजार २५० लिटर दूध नष्ट करण्यात आले. हे दूध ज्या जिल्ह्यातून आले होते, त्या जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना त्या दूध संकलन केंद्रांवर कारवाई सुरु करण्यात आली.एकाच वेळी अनेक ठिकाणी कारवाईराज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरिश बापट यांच्या मार्गदर्शनात झालेली ही मोहीम एकाच वेळी राज्यातील विविध ठिकाणी पहाटेपर्यंत सुरु होती. या धडक कारवाईमध्ये तब्बल २२७ वाहनांमधील ९ लाख २२ हजार ९२८ लिटर दूध तपासण्यात आले. या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठा