शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात मुंबईतील तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2017 05:13 IST

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगद्याजवळ कार झाडावर

मोहोपाडा/ रसायनी : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगद्याजवळ कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात मुंबईतील कांदिवली भागात राहणारे तीन ठार तर सहा जण जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली एमएच ०२, एन ए-८२५ ही कार पानशिळ गावाच्या हद्दीत भाताण बोगद्याजवळ सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आली असताना कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार द्रुतगती महामार्गालगतच्या झाडावर जाऊन आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की हे झाड बुंद्यासह तुटून पडले तर कारमधील दोन जागीच ठार झाले.या अपघातात लालबी मोहीनिबन मुजावर (५५), रुक्साना शहाबुद्दीन शेख (३६) या जागीच ठार झाल्या. तर आलिया शहाबुद्दीन शेख (९) या मुलीचा उपचारार्थ नेत असताना मृत्यू झाला. तर कारमधील गुड्डू अकबर मुजावर (६०), सुलतान मोहमुद्दीन मुजावर (२०), हसन मोहमुद्दीन मुजावर (२०), सोहल हमीद मुजावर (७), सोमब अल्ताफ सय्यद (७) तसेच कारचालक जावेद युनुस शेलोट (३०) सर्व राहणार कांदिवली हे सहा जण जखमी झाले असून जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद रसायनी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. (वार्ताहर)