शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

३० लाखांत विकल्या तिघांच्या किडन्या!

By admin | Updated: December 2, 2015 01:27 IST

अकोला पोलिसांनी किडनी तस्करांचे रॅकेट उघड केले असून, ३० लाख रुपयांमध्ये तीन किडन्या विकल्याची माहिती समोर आली आहे. पैशांचे आमिष दाखवून एका ५0वर्षीय महिलेसह

- सचिन राऊत,  अकोलाअकोला पोलिसांनी किडनी तस्करांचे रॅकेट उघड केले असून, ३० लाख रुपयांमध्ये तीन किडन्या विकल्याची माहिती समोर आली आहे. पैशांचे आमिष दाखवून एका ५0वर्षीय महिलेसह ३0 वर्षे वयाच्या दोन युवकांच्या किडन्या तस्करांनी विकल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरिहरपेठमधील रहिवासी असलेल्या दोघांची किडनी तस्करीच्या संशयावरून स्थानिक गुन्हे शाखेकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. या दोघांमधील एकाने तत्काळ पासपोर्ट काढल्याचे समोर आले आहे. त्याने हरिहरपेठ पोलीस चौकी परिसरातील तीन जणांच्या किडनीचा खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्याचे उजेडात आले आहे. त्यात शांताबाई नामक ५०वर्षीय महिलेचा समावेश आहे. या महिलेला १० लाख रुपयांचे आमिष दाखवून, तिची किडनी काढण्यात आली. याशिवाय ३० वर्षांखालील दोन युवकांच्याही किडनी काढण्यात आल्याचे समजते. पोलिसांच्या चौकशीत या तिघांची नावे समोर आल्याची माहिती आहे; मात्र स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्यावर अजून अधिकृतपणे शिक्कामोर्तब केलेले नाही. गुन्हे शाखेचे पोलीस या आंतरराष्ट्रीय टोळीच्या मुसक्या आवळण्याच्या तयारीत आहेत.हलाखीच्या आर्थिक परिस्थितीचा घेतला फायदाकिडनी तस्करांनी ५०वर्षीय शांताबाई, अमर आणि देवा यांची किडनी काढून, त्या प्रत्येकी १0 लाख रुपयांत गरजूंना विकल्याची माहिती समोर येत आहे. तिघांचीही आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याचे समजते.