शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या तीन अपहृत विद्यार्थ्यांची सुटका

By admin | Updated: January 4, 2016 03:23 IST

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुण्याच्या तीन विद्यार्थ्यांचे रविवारी सकाळी अपहरण केले होते.

रायपूर/गडचिरोली : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुण्याच्या तीन विद्यार्थ्यांचे रविवारी सकाळी अपहरण केले होते. मात्र नंतर त्यांनी त्यांना मुक्त केले. हे युवक शांततेचा संदेश देण्यासाठी सायकलने मोहिमेवर निघाले होते आणि पुण्याहून गडचिरोलीमार्गे छत्तीसगडला जात असताना काही दिवसांपूर्वी त्यांचे अपहरण झाले होते.आदर्श पाटील, विकास वाळके, श्रीकृष्ण शेवाळे (रा. कराड ता. सातारा) अशी त्यांची नावे असून, जवळच्याच बिजापूर जिल्ह्यातील बसागुडा भागात त्यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना जगरगुंडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चिंगरजवळील तिम्मपुरम् गावात माओवादी कमांडर पापा राव याच्या ताब्यात देण्यात आले. अपहरणाचे वृत्त कळताच पोलिसांनी दक्षिण बस्तरमधील सर्व नक्षलविरोधी मोहिमा तातडीने थांबविल्या. त्यानंतर पोलिसांनी या तीनही तरुणांचा ठावठिकाणा शोधला आणि त्यांच्या सुटकेसाठी विविध माध्यमांद्वारे अपहरणकर्त्यांसोबत बातचीत केली, असे बस्तरचे पोलीस महानिरीक्षक एस.आर.पी. कल्लुरी यांनी सांगितले. परंतु नक्षल्यांसोबत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती मात्र त्यांनी दिली नाही. २३ डिसेंबर रोजी हे तीनही तरुण नागपूर येथून भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे पोहोचले. २५ ते २८ डिसेंबरदरम्यान बेद्रे, कारकेली, बैरमगड असा प्रवास करून २९ डिसेंबर रोजी ते छत्तीसगड राज्यातील बिजापूर येथे पोहोचले. याच ठिकाणाहून नक्षल्यांनी तिघांचेही अपहरण केले. अज्ञातस्थळी नेऊन दोन ते तीन दिवस त्यांची कसून चौकशी केली. यादरम्यान एका नक्षल समर्थकामार्फत नागपूर येथे संपर्क झाल्याने ही घटना उघडकीस आली. (वृत्तसंस्था/प्रतिनिधी)धोक्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष : सुटका झाल्यानंतर या तरुणांना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या चिंतलनार कॅम्पवर सोडण्यात आले. त्यानंतर त्यांना हवाईमार्गे जगदलपूर येथे नेण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी या तरुणांनी अशा प्रकारची यात्रा काढण्यासाठी सुकमा प्रशासनाशी संपर्क साधला होता. मात्र अशी यात्रा काढणे धोकादायक ठरू शकते, अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या होत्या.