शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तीन जहाल नक्षल्यांना कंठस्नान, शस्त्रसाठा जप्त

By admin | Updated: June 19, 2016 17:39 IST

अहेरी तालुक्यातील काटेपल्ली जंगल परिसरात पोलीस व नक्षली यांच्यामध्ये रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास चकमक उडाली.

ऑनलाइन लोकमत

गडचिरोली, दि. 19 - अहेरी तालुक्यातील काटेपल्ली जंगल परिसरात पोलीस व नक्षली यांच्यामध्ये रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास चकमक उडाली. या चमकीत तीन जहाल नक्षलवादी ठार झाले असून त्यांचे मृतदेह पोलिसांनी जप्त केले आहेत. गडचिरोली पोलीस दलाचे विशेष अभियान पथक व तेलंगणा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने काटेपल्ली जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबविले जात होते. दरम्यान जंगलात लपून बसलेल्या नक्षल्यांनी पोलीस पथकाच्या दिशेने अंदाधूंद गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. या चकमकीत तीन नक्षली ठार झाले. पोलिसांचा वाढता दबाव बघून नक्षल्यांनी जंगलात पळ काढला. चकमकीनंतर पोलीस पथकाने घटनास्थळाचा शोध घेतला असता, घटनास्थळावरून तीन नक्षल्यांचे मृतदेह, एक नग एके-४७ रायफल, एक नग एसएलआर रायफल, एक नग ३०३ रायफल जप्त केले. ठार झालेल्या नक्षल्यांकडे एके-४७, एसएलआर रायफल व ३०३ रायफलसारखे अत्याधुनिक शस्त्र आढळून आले. याचा अर्थ चकमकीत ठार झालेले नक्षलवादी हे कमांडर वा त्यापेक्षा मोठ्या दर्जाचे नक्षली असण्याची शक्यता आहे. ठार झालेल्या नक्षल्यांची ओळख पटविण्याचे काम पोलीस विभागाकडून सुरू होते. मात्र वृत्त लिहिपर्यंत नक्षल्यांची ओळख पटली नाही. मागील सहा महिन्यातील पोलीस विभागाने नक्षल्यांविरोधात केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.