अहमदनगर : दुचाकीला कट का मारला, अशी विचारणा केल्याचा राग आल्याने दोघा जणांना एका जमावाने मारहाण केली. शुक्रवारी रात्री झालेल्या या घटनेत तलवारीने मारहाण झाल्याने दीपक सुरेश नेटके, अजय नेटके, नितीश सुभाष जाधव (रा. सावेडी) हे तिघे जखमी झाले.अजय नेटके हा मोटारसायकलवरून जात असताना अमोल ताठे याने कट मारला.भावाला कट का मारला, अशी दीपक नेटके याने ताठे याच्याकडे विचारणा केली. याचा राग आल्याने अमोल ताठे, मयूर ताठे, विरजेन ताठे,ऋषिकेश ताठे, करण ससे यांच्याशी संगनमत करून नेटके यांना तलवार, लोखंडी पाईप, लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना फुलारी पेट्रोल पंपाजवळ घडली. या मारहाणीत दीपक, अजय नेटके व नितीश जाधव जखमी झाले. मारहाण केल्यानंतर पाचही जण पसार झाले. परिसरातील नागरिकांनी जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी दीपक नेटके यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.
तलवारीच्या हल्ल्यात सावेडीत तीन जखमी
By admin | Updated: June 6, 2016 23:51 IST