शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

देशी बनावटीच्या तीन पिस्टल अकोल्यात जप्त

By admin | Updated: August 31, 2014 00:27 IST

अकोल्यात देशी बनावटीच्या तीन पिस्टल जप्त; म्होरक्यासह सहा आरोपी गजाआड.

अकोला: जिल्हय़ामध्ये मोठय़ा प्रमाणात परप्रांतातून देशी कट्टा, पिस्टल, काडतूस आणि तलवारींची तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास तीन आरोपींना गजाआड करून त्यांच्याकडील देशी बनावटीचे तीन पिस्टल जप्त करण्यात यश मिळविले. नंतर पोलिसांनी देशी कट्टा व पिस्टलची तस्करी करणार्‍या टोळीतील आणखी चार आरोपींना अटक केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गत वर्षभरातील पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय ज्ञानेश्‍वर फड व त्यांच्या पथकातील मनोहर मोहोड, शेख हसन यांना शुक्रवारी उशिरा रात्री जिल्हय़ात काही युवक पिस्टल, देशी कट्टय़ाची तस्करी करून त्याची विक्री करीत असल्याची माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवणीतील क्रांती नगर, बाश्रीटाकळीतील लोहगड आणि बाळापूर तालुक्यातील कोळासा येथील गावांमध्ये झाडाझडती घेतली. झडतीदरम्यान पोलिसांनी शिवणीतील अमोल नंदकिशोर साळवे (२५) याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने लोहगडचा उमेश जोंधळे (२२) आणि कोळासाचा उमेश गुलाबराव सोळंके (२३) यांची नावे सांगितली. पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्रीच दोघांना अटक केली. पोलिसांनी तिघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी तीन पिस्टल व काडतूसची माहिती दिली आणि त्या पिस्टल हरिहरपेठेतील राजकुमार ऊर्फ राज अरुण यादव (२५) याच्याकडे असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्यासाठी काम करणारे टाकळी रेल्वे येथील अमोल काशीराम जामनिक (२६), सोपीनाथ नगरातील पवन एकनाथ गावंडे (२४) आणि किल्ला चौकातील राहुल श्यामकुमार शर्मा (२३) यांनाही पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी राज यादव याच्या घराची झडती घेऊन देशी बनावटीची तीन पिस्टल व दोन काडतूस जप्त केले. *अमोल साळवे हा म्होरक्याशिवणीत राहणारा अमोल साळवे हा शस्त्र तस्करी टोळीचा म्होरक्या आहे. त्यानेच पिस्टल विकत असल्याचे सांगत, या कामी त्याला उमेश जोंधळे व उमेश सोळंके हे मदत करतात. या तिघांनी पवन गावंडे व राहुल शर्मा याच्या मध्यस्थीने हरिहरपेठेतील राज अरुण यादव याला फक्त १0 हजार रुपयांमध्ये पिस्टल विकल्याचे पोलिसांना सांगितले.