शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

‘आयएम’चे तीन दहशतवादी इसिसमध्ये

By admin | Updated: July 10, 2015 04:08 IST

इंडियन मुजाहिदीनचे(आय एम) तीन दहशतवादी इस्लामिक संघटनेत सहभागी झाले असून, सीरियात युद्ध करत असल्याचे एनआयए या राष्ट्रीय तपास संस्थेने म्हटले आहे

डिप्पी वांकाणी,  मुंबईइंडियन मुजाहिदीनचे(आय एम) तीन दहशतवादी इस्लामिक संघटनेत सहभागी झाले असून, सीरियात युद्ध करत असल्याचे एनआयए या राष्ट्रीय तपास संस्थेने म्हटले आहे. २००८च्या स्फोटातील आरोपी असणाऱ्या या तिघांवर प्रत्येकी १० लाख रुपयांचे बक्षीस लावण्यात आले आहे. एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, इंडियन मुजाहिदीनचे संस्थापक नेते रियाझ व इकबाल भटकळ यांच्याशी मतभेद झाल्यानंतर या तिघांनी इंडियन मुजाहिदीन सोडून अफगाणिस्तानातील तालिबान संघटनेत प्रवेश केला व अलीकडेच इसिसमध्ये प्रवेश केला. मोहम्मद खालिद, अरिझ खान उर्फ जुनैद व मिर्झा शादाब बेग अशी त्यांची नावे असून, एनआयएला जयपूर, अहमदाबाद व दिल्ली येथे २००८ साली झालेल्या स्फोटाप्रकरणी हे तिघे हवे होते. या तिघांबरोबर इसिसच्या युद्धात सहभागी झालेला मोहम्मद साजिद उर्फ बडा साजिद हा गेल्या आठवड्यात ठार झाला आहे. या फरार दहशतवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी या चौघांचा अफगाणिस्तानात एका जीपमध्ये बसलेला फोटो पाहिला, त्यावरून हे तालिबानमध्ये सहभागी झाले असावेत असा निष्कर्ष काढण्यात आला. हे चौघेही उत्तर प्रदेशातील आझमगड येथील असून, त्यांना भटकळ बंधूंनी इंडियन मुजाहिदीनमध्ये सहभागी करून घेतले होते. जिहादच्या नावावर भटकळ बंधू स्वत:च पैसे कमावत असल्याचे या चौघांच्या लक्षात आल्यानंतर त्यानी इंडियन मुजाहिदीन सोडली. चौघांपैकी एक जण मारला गेला आहे.