लोणावळा : मुंबई पुणो द्रुतगती महामार्गावर मुंबईकडे नायट्रोजन गॅस घेऊन निघालेला एक टँकर सायंकाळी पाचच्या अमृतांजन पुलाच्या कठडय़ाला धडकून रस्त्यात उलटला. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे तीन तास विस्कळीत झाली होती़ यामुळे मुंबईकडे जाणा:या मार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ रात्री आठ वाजता ही वाहतूक पुर्वपदावर आली़
खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (एमएच क्4 सीजी 3971) क्रमांकाचा टँकर पुण्याहून मुंबईच्या दिशेने नायट्रोजन गॅस घेऊन जात होता. अमृतांजन पुलाजवळील उतार व वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे टॅकर पुलाच्या मधील कठडय़ाला धडकून रस्त्यात उलटला़ यावेळी टॅकरचे इंजिन ऑईल मोठय़ा प्रमाणात रस्त्यावर सांडल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ थांबविण्यात आली.
ऑईलवर माती व भूसा टाकत प्रथम टँकर आयआरबी कंपनीच्या क्रेनच्या साह्याने मार्गातून बाजुला करण्यात आला. दरम्यान सायंकाळची वेळ असल्याने मुंबईकडे जाणा:या मार्गावर वाहतूक ठप्प होऊन लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ काही वेळ ऐकरी मार्गाने वाहतूक सुरु करत रात्री आठ वाजता सुरळीत करण्यात आली़ अपघातानंतर टँकर चालक घटनास्थळावरुन फ रार झाला़ सुदैवाने या अपघातात कसलीही जिवितहानी झाली नाही़ पोलीस निरीक्षक एम़टी़ चाळके व कर्मचारी पवार, संदीप सावंत यांनी वाहतूक सुरळीत केली़