शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयीन दप्तर सादर न करणारे तीन ग्रामसेवक तुरुंगात!

By admin | Updated: February 19, 2017 02:01 IST

वाशिम जिल्हाधिकार्‍यांचे आदेश; तिघे फरार.

वाशिम, दि. १८- कार्यमुक्त झाल्यानंतरही कार्यरत ग्रामसेवकांकडे कार्यभार न देणे, स्थानिक निधी लेखा परीक्षणासाठी कार्यालयीन दप्तर उपलब्ध करून न देणार्‍या सहा ग्रामसेवकांना दिवाणी कारागृहात डांबून ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी जानेवारी महिन्यात दिले होते. त्यानुसार १८ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेने तीन ग्रामसेवकांना ताब्यात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या सुपूर्द केले. या ग्रामसेवकांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली.मालेगाव तालुक्यातील ग्रामसेवक एस.एम. ठाकरे, एस.एच. अंभोरे, एस.एम. कांबळे, पी.यू. चिकटे, ए. एस. साठे, व्ही.पी. चिकटे या सहा ग्रामसेवकांनी कार्यमुक्त झाल्यानंतर रुजू होणार्‍या संबंधित ग्रामसेवकांना कार्यालयीन दप्तर, अभिलेखे सोपविलेच नाही. त्यामुळे स्थानिक निधी लेखा परीक्षणासाठी या ग्रामसेवकांनी दप्तर उपलब्ध झाले नाही. गटविकास अधिकारी आणि त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या निर्देशाकडेदेखील त्यांनी तब्बल तीन वर्षांपर्यंत दुर्लक्ष केले. त्यानंतर दप्तर सोपविण्याची वारंवार संधीही दिली. तथापि, या निर्देशांकडे संबंधित ग्रामसेवकांनी दुर्लक्ष केल्याने शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सदर प्रकरण सोपविले. जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित ग्रामसेवकांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १७९, कलम १ नुसार नोटिस देऊन त्यांच्या ताब्यातील ग्रामपंचायतीचे अभिलेखे २७ डिसेंबर २0१६ पर्यंत कार्यरत ग्रामसेवकांना अथवा गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मालेगाव यांच्या स्वाधीन करण्याबाबत आदेश दिले; मात्र संबंधितांनी या आदेशाचे उल्लंघन करून त्यांच्या ताब्यातील अभिलेखे हस्तांतरित केले नाही.१८ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेने एस.एम. ठाकरे, एस.एच. अंभोरे व एस.एम. कांबळे या तीन ग्रामसेवकांना ताब्यात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या सुपूर्द केले. जिल्हा प्रशासनाने या ग्रामसेवकांची जिल्हा कारागृहात रवानगी केली. उर्वरित पी.यू. चिकटे, ए. एस. साठे, व्ही.पी. चिकटे हे तीन ग्रामसेवक फरार असून, पोलीस त्यांच्या शोधात आहेत. कर्तव्यात कसूर करणार्‍या कर्मचार्‍यांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्याची जिल्हय़ातील ही पहिलीच वेळ आहे. या कारवाईमुळे कामचुकार व कर्तव्यात कसूर करणार्‍या कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.