शहरं
Join us  
Trending Stories
1
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
2
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मध्यस्थीसाठी विनंती
3
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
4
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
5
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
6
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
7
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
8
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
9
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
10
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
11
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
12
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
13
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
14
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
15
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
16
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
17
CSK स्टार मुरली विजय दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
18
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
19
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
20
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?

बेकरीची चिमणी कोसळून जोगेश्वरीत तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 05:35 IST

जोगेश्वरी येथे शनिवारी रात्री उशिरा एका बेकरीची चिमणी कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जण ठार आणि अन्य दोघे जखमी झाले.

मुंबई : जोगेश्वरी येथे शनिवारी रात्री उशिरा एका बेकरीची चिमणी कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जण ठार आणि अन्य दोघे जखमी झाले. जखमींपैकी एकाला डिस्चार्ज देण्यात आला असून, दुसऱ्यावर कूपरमध्ये उपचार सुरू आहेत. किस्मत अन्सारी (२२), जितेंद्र अन्सारी (२१) आणि तेजी भार्गव (२२) अशी मृतांची नावे आहेत, तर दोन जखमींपैकी एकाला डिस्चार्ज दिला असून, एकावर कूपरमध्ये उपचार सुरू आहेत.जोगेश्वरी पश्चिम येथील एस. व्ही. रोडवरील अक्सा बेकरीच्या चिमणीचा काही भाग लगतच्या गाळ्यावर पडल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या दुर्घटनेत एक महिला आणि चार पुरुष जखमी झाले. जखमींना ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, किस्मत अन्सारी (२२) आणि जितेंद्र अन्सारी (२१) यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. तेजी भार्गव (२२) यांचा रविवारी पहाटे १ वाजता मृत्यू झाला, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. राजू भारद्वाज (२६) यांच्या डोक्याला मार लागला असून, त्यांना ट्रॉमा केअर रुग्णालयातून कूपर रुग्णालयात नेण्यात आले आहे. अजी मुल्ला (४८) यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. या प्रकरणी जोगेश्वरी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.