शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांच्या हल्ल्यात तिघे मृत्युमुखी

By admin | Updated: April 26, 2017 01:50 IST

दरोडेखोरांच्या हल्ल्यात ज्येष्ठ दाम्पत्य आणि त्यांचा तरुण मुलगा मृत्युमुखी पडल्याची घटना मावळ तालुक्यातील धामणे गाव येथे घडली.

तळेगाव दाभाडे (जि. पुणे) : दरोडेखोरांच्या हल्ल्यात ज्येष्ठ दाम्पत्य आणि त्यांचा तरुण मुलगा मृत्युमुखी पडल्याची घटना मावळ तालुक्यातील धामणे गाव येथे घडली. मंगळवारी पहाटे ४ ला दरोडेखोरांच्या आठ जणांच्या टोळक्याने शेतातील घरात घुसून, डोक्यात टिकावाचे घाव घालून अमानुष मारहाण करीत लुटमार केली. या हल्ल्यात एक महिला आणि सहा वर्षांची बालिका जखमी झाली आहे.सोमाटणे फाट्यापासून काही अंतरावर हे धामणे गाव आहे. तेथून १ किलोमीटर अंतरावरील शेतात फाले कुटुंबीयांचे घर आहे. दरोडेखोरांनी फाले यांच्या घराचा पुढील लाकडी दरवाजा तोडून, तसेच मागील खिडकी उचकटून घरात प्रवेश केला. झोपेत असलेल्यांच्या डोक्यात टिकावाचे घाव घातले. त्यात नथू विठोबा फ ाले (वय ६५), त्यांची पत्नी छबाबाई (६०) आणि मुलगा अत्रिनंदन उर्फ आबा (३०) हे मृत्युमुखी पडले. फाले यांची सून तेजश्री अत्रिनंदन फाले (वय २५) डोक्याला मार लागल्याने बेशुद्ध पडल्या, तर सहा वर्षांची नात अंजली अत्रिनंदन फाले ही जखमी झाली. त्यानंतर, दरोडेखोरांनी महिलांच्या अंगावरचे दागिने लुटून नेले. शुद्धीवर आल्यानंतर सून तेजश्री यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर, आजूबाजूचे आणि गावातील लोक त्या ठिकाणी आले. ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, देहू रोडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुणे येथून श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते. या घटनेमुळे संपूर्ण मावळ खोऱ्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)