शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

जिलेटिनच्या भीषण स्फोटात तीन ठार, पाच जखमी

By admin | Updated: January 10, 2015 01:41 IST

माण तालुक्यात पवनचक्की उभारणीच्या कामासाठी आणलेल्या जिलेटिन कांड्यांचा स्फोट होऊन तीनजण ठार, तर पाचजण गंभीर जखमी झाले.

दहिवडी (सातारा) : माण तालुक्यात पवनचक्की उभारणीच्या कामासाठी आणलेल्या जिलेटिन कांड्यांचा स्फोट होऊन तीनजण ठार, तर पाचजण गंभीर जखमी झाले. पवनचक्की कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीस माहिती घेत आहेत.दादासाहेब रामचंद्र जगदाळे (५0), संदीप उत्तम माने (३५), शशिकांत पांडुरंग कुलकर्णी (३५) अशी मृतांची नावे आहेत. माण तालुक्यातील बोथे येथील ‘जंगला’ नावाच्या शिवारातील डोंगरावर तीन कंपन्यांकडून पवनचक्क्या उभारणीचे काम सुरू आहे. येथे कंपन्यांनी कामगारांसाठी निवासस्थाने तसेच साहित्य ठेवण्यासाठी शेड उभारली आहेत. स्फोट झालेले जिलेटिन ‘बोथे विंड फार्मा’ कंपनीचे आहे, अशी माहिती दुर्घटनेतील जखमींनी जिल्हा रुग्णालयात दिली. कंपनीने येथे दीडशे फूट लांबीचे गोदाम उभारले असून यामध्ये जिलेटिनचा साठा करून ठेवला होता. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे काही कामगार कामावर आले. यानंतर नऊ वाजता येथे जिलेटिन कांड्यांचा स्फोट झाला. या स्फोटाने परिसर हादरून गेला. परिसरातील अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले, तर अनेक घरांवरील कौले फुटली.स्फोटाच्या आवाजाने ग्रामस्थांनी डोंगराच्या दिशेने धाव घेतली. घटनास्थळी आल्यानंतर त्यांना पत्रे, पवनचक्की साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. यामध्ये शशिकांत कुलकर्णी जागीच ठार झाले होते. ग्रामस्थांनी ढिगाऱ्यातून जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी खासगी वाहनातून जिल्हा रुग्णालयात आणले. स्फोटाच्या या प्रकारा नंतर पवनचक्की कंपनी व पंचक्रोशीतील जनते मध्ये भितीचे वातावण आहे. (प्रतिनिधी)दीडशे कामगार बचावले...या ठिकाणी दीडशेहून अधिक कामगार उत्तर प्रदेश येथील आहेत. तीनच दिवसांपूर्वी हे कामगार आपल्या गावी निघून गेल्यामुळे ते सुदैवी ठरले. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याविषयी जिल्हा प्रशासनही बोलायला तयार नव्हते. मात्र, घटनास्थळावरून मिळालेली माहिती आणि स्थानिकांशी चर्चा केली असता शुक्रवारी येथे उपस्थित असणारे सुरक्षारक्षक साफसफाई करून कचऱ्याची विल्हेवाट लावत होते. हा कचरा त्यांनी पेटवून दिला आणि त्यामुळेच हा स्फोट झाल्याची चर्चा होती.साताऱ्याच्या बोथे (ता. माण) येथे जिलेटिनचा शुक्रवारी स्फोट झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी पवनऊर्जा कंपनीच्या कार्यालयाची मोडतोड केली.दहिवडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आम्ही या प्रकरणात तीन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. - डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, सातारा