शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार भाविकांचा तीन दिवस निरंकार

By admin | Updated: January 5, 2016 01:52 IST

शिरपूर येथील अंतरिक्ष पार्श्‍वनाथ मंदिर उघडण्यासाठी भाविकांचे साकडे.

वाशिम : जैनांची काशी म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या जिल्हय़ातील शिरपूर जैन येथील अंतरिक्ष पार्श्‍वनाथ भगवंताचे मंदिर मागील ३२ वर्षांपासून बंदिस्त आहे. हे मंदिर पूजन व दर्शनासाठी उघडावे, या उदात्त हेतूने अंतरिक्ष पार्श्‍वनाथ संस्थान व मुंबई येथील कांदिवली घोघारी विसाश्रीमाली जैन मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय अठ्ठम तप ३ जानेवारी रोजी प्रारंभ करण्यात आला असून, या कठोर तपश्‍चर्येच्या माध्यमाने तब्बल एक हजार भाविकांनी थेट अंतरिक्ष पार्श्‍वनाथालाच मंदिर उघडण्यासाठी साकडे घातले आहे. या अठ्ठम तपामध्ये सतत तीन दिवस निरंकार उपवास करणे आवश्यक असून, यामध्ये एक हजार भाविकांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये पुरुष, महिला, युवक, युवती, बालक, बालिका यांचा समावेश असून, बुधवार ६ जानेवारी रोजी या तपामध्ये सहभागी सर्व भाविक उपवास सोडतील. अंतरिक्ष तीर्थ उद्धारक प.पु.श्री विमलहंस विजयजी महाराज यांच्या प्रेरणेने तसेच प.पु. कुलवर्धनश्रीजी, प.पु. श्री परमहंस विजयजी महाराज व प.पु. श्री श्रमणहंस विजयजी महाराज, साध्वीश्री सुमिताश्रीजी आदी ठाणा यांच्या मार्गदर्शनात अठ्ठम तपाला उत्साहात सुरुवात झाली असून, श्री विघ्नहर पार्श्‍वनाथ नूतन मंदिरात स्नात्र पूजा, अढार अभिषेक, वामा माता पूजन, मनिभद्र स्वामी व पद्मावती माता पुजनासह रात्री भक्ती संगीताचा कार्यक्रम तसेच मुनिश्रीचे प्रवचन आदी कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडत आहेत. अठ्ठम तपामध्ये मुंबई येथील ९00 भाविक तसेच मंगरुळ, कारंजा, अकोला, दिग्रस, बाळापूर, खामगाव, लोणार, नांदेड, हिंगोली, कळमनुरी व परिसरातील असे एकूण एक हजार भाविकांनी या तपसाधनेत सहभाग घेतला आहे. अंतरिक्ष पार्श्‍वनाथचे द्वार लवकरात लवकर उघडावे व अंतरिक्ष पार्श्‍वनाथ भगवंताच्या मूर्तीचे पूजन तसेच दर्शनाचा लाभ भाविकांना मिळावा, या श्रद्धेने एक हजार भाविक निरंकार तपामध्ये बसले आहेत. या धार्मिक सोहळय़ाच्या यशस्वितेसाठी व्यवस्थापक बाबूराव बोराटे व दिनेश मुथा, जयदीप कोठारी, राहुल जैन व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.