शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

भीती दाखवत तीन कोटींचे दागिने लांबवले

By admin | Updated: April 4, 2017 03:21 IST

हिरेजडीत दागदागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी राजेश तुळसीदास नाखुवा या कथित डिटेक्टिव्हला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली

मुंबई : पतीच्या कार्यालयासह घरावर आयकर विभागाची कारवाई होणार असल्याची बतावणी करून एका व्यावसायिकाच्या पत्नीकडील तीन कोटी रुपयांच्या हिरेजडीत दागदागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी राजेश तुळसीदास नाखुवा या कथित डिटेक्टिव्हला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. आरोपीने तक्रारदार महिलेचे दागिने परत केल्याचा दावा न्यायालयात खोटा ठरल्यानंतर सत्र न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन रद्द केल्याने यातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.तक्र ारदार महिला पती व लहान मुलीसह राहत असून तिची राजेश नाखुवा, दीपक देवजी भानुशली, मीरा ठक्कर उर्फ मीरा चंदन यांच्याशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर व्यावसायिकाच्या पत्नीची फसवणूक करून तिला लुटण्याच्या उद्देशाने राजेश, दीपक आणि मीरा चंदन यांनी कट रचून तक्रारदार महिलेला तिच्या पतीचे कार्यालयातील सीए असलेल्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे सांगून त्याबाबतचे पुरावे देण्याचा बहाणा करून महिलेकडून चार लाख रुपये उकळले. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा राजेश महिलेच्या घरी गेला व तुमच्या पतीच्या कार्यालयावर व घरावर आयकर विभागाचा छापा पडणार असल्याचे सांगून त्या महिलेकडील दागदागिने व इतर ऐवज सुरक्षित ठेवण्याचा सल्ला देत महिलेच्या बँक लॉकरमध्ये असलेले तीन कोटींचे दागिने स्वत:कडे ठेवले. मात्र आयकर विभागाचा छापा न पडल्याने तक्रारदार महिलेने राजेशकडे तिचे दागिने मागितले. मात्र राजेश याने महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवत कुटुंबाला ठार मारण्याची तसेच मुलीचे अपहरण करण्याची धमकी देऊन तिच्याकडे आणखी ५0 लाख रुपये खंडणीची मागणी केली. घाबरलेल्या महिलेने या प्रकाराची माहिती पतीला दिल्यानंतर पतीने या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. राजेश, दीपक व मीरा चंदन यांनी न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. दीपक व मीरा चंदन यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला, मात्र राजेश याचा जामीनअर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. कारण त्याने न्यायालयाला तक्र ारदार महिलेचे दागिने परत केल्याची खोटी माहिती दिली होती. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली (प्रतिनिधी)दीपक व मीरा चंदन यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला, मात्र राजेश याचा जामीनअर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. कारण त्याने न्यायालयाला तक्रारदार महिलेचे दागिने परत केल्याची खोटी माहिती दिली होती.