ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - विरारमध्ये तीन बेपत्ता शालेय विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. विरारमधील सकवार येथे वगड इंटरनॅशनल शाळेच्या इमारतीमागील खाडीत हे मृतदेह तरंगताना आढळले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीत धाडवी, प्रफुल पटेल आणि कुशल धाडा अशी त्या तिघांची नावे असून नववीत शिकणारे हे तिघे २५ ऑगस्टपासून बेपत्ता होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.