शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तीन आसनी रिक्षाचालक ‘वडाप’विरोधात

By admin | Updated: April 11, 2017 00:26 IST

मोहिमेस पाठबळ : सतरा संघटनांचा संयुक्तपाठिंबा : मोहीम तीव्रतेने राबविण्याचे पवार यांचे आश्वासन

कोल्हापूर : शहरात सुरूअसलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्याच्या प्रादेशिक परिवहन विभागा (आर.टी.ओ)च्या मोहिमेला सोमवारी भक्कम बळ मिळाले. शहरातील तीन आसनी प्रवासी वाहतूक सर्व १७ रिक्षा संघटनांनी भारतीय जनता पार्टी रिक्षा संघटनेच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन प्रादेशिक परिवहन अधिकारी डी. टी. पवार यांना पाठिंबा दर्शविला. ‘पवारसाहेब आगे बडो, हम तुमारे साथ है’ अशा घोषणा कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर रिक्षाचालकांनी दिल्या. पवार म्हणाले, तुमच्या सहकार्यामुळे ही मोहीम अधिक तीव्र राबविण्यासाठी पाठबळ मिळाले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा आसनी रिक्षाचालकांनी आपला व्यवसाय शहराच्या हद्दीबाहेर करावा, असेही आवाहन त्यांनी केले. प्रामाणिकपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांच्या पाठीशी ‘आरटीओ’चे अधिकारी निश्चितपणे राहतील, अशीही ग्वाही पवार यांनी दिली. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांविरोधी कारवाईसाठी महापालिका आणि आरटीओ यांच्या संयुक्ततेने चार पथके स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी सर्व रिक्षा संघटनेच्यावतीने बाबा इंदूलकर, विजय गायकवाड, सुभाष शेटे यांनीही विचार मांडताना, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शहरांतर्गत प्रवासी अवैध वाहतूक करणारी समांतर वाहतूक व्यवस्था बंद करावी, सहा आसनी वाहतूकसुद्धा बंद करावी, तीन आसनी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांसाठी परवाना असताना आठ ते दहा प्रवासी वाहतूक करणाऱ्या अ‍ॅपे डिझेल रिक्षांवर कारवाई सुरू ठेवावी, ग्रामीण भागात परवाना असताना शहरांतर्गत वाहतूक केली जाते त्यांच्यावर कारवाई करावी, वायू, ध्वनिप्रदूषण थांबवावे, आदी मुद्दे मांडले.रिक्षा व्यावसायिकांनी ‘आरटीओ’ कार्यालयाच्या प्रवेशद्वारात कारवाईचे समर्थन करणाऱ्या घोषणा दिल्या. शिष्टमंडळाद्वारे प्रादेशिक परिवहन अधिकारी डी. टी. पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोटर वाहन निरीक्षक ए. के. पाटील, प्रदीप गुरव हे उपस्थित होते. यावेळी विजय गायकवाड, बाबा इंदूलकर, राजू जाधव, सुभाष शेटे, अरुण घोरपडे, शंकर पंडित, ईश्वर चैनी, अविनाश दिंडे, शफुद्दिन शेख, दिलीप मोरे, रमेश पोवार, मोहन बागडी, राजू शाहीर, जाफर मुजावर, अविनाश वांद्रे, अनिल लांबोरे, राजू पाटील, शेखर कोळेकर, आदी सहभागी झाले होते. दबावाला बळी पडू नकारिक्षा व्यावसायिकांनी, ‘आरटीओ’च्या कार्यालयाच्या वडापविरोधी मोहिमेचे स्वागत करीत या कारवाईबाबत दबावाला बळी न पडता प्रामाणिक रिक्षा व्यवसाय करणाऱ्या चालकांच्या पाठीशी ‘आरटीओ’ने राहावे, असे आवाहन केले; पण दबावाला बळी पडून कारवाई थांबली तर या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असाही इशारा यावेळी दिला.