शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

युवतीच्या खून प्रकरणी तिघांना अटक

By admin | Updated: May 9, 2014 22:24 IST

गुन्‘ांंमध्ये मदत करण्यास नकार दिल्यामुळे प्रियकरानेच साथीदारांकरवी युवतीचा खून करवल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

प्रियकरच मुख्य सूत्रधार : फसवणुकीच्या गुन्‘ात मदतीस नकार दिल्याने कृत्यपुणे : नायजेरियन फ्रॉडसारख्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्‘ांंमध्ये मदत करण्यास नकार दिल्यामुळे प्रियकरानेच साथीदारांकरवी युवतीचा खून करवल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. तळेगाव रेल्वे स्थानकावर बुधवारी सुटकेसमध्येयुवतीचा मृतदेह आढळला होता. सराईत गुन्हेगार असलेल्या या प्रियकरासह तिघांना रेल्वे पोलिसांनी गजाआड केले आहे. मारेकरी आणि युवती मुंबईचे असल्याचेही निष्पन्न झाल्याची माहिती पुणे विभागाचे अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिली.राणी सभाजीत सिंग (रा. हिंमतनगर, हनुमान मंदिराजवळ, वडाळा (पू.) मुंबई) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. याप्रकरणी संतोष विष्णू जुगदर (वय ३१, रा. हिंमतनगर, विद्या कॉलेजच्या बाजूला, वडाळा, मुंबई), राहुल रवींद्र बरई (वय २१, रा. जय महाराष्ट्र नगर, सायन कोळीवाडा, वडाळा), ईशान हमजान अली कुरेशी (वय २१, रा. भारतीय कमलानगर, एस. पी. रोड, ॲन्टॉप हिल, वडाळा) यांना अटक करण्यात आली आहे. पानसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष विवाहित असून त्याचे राणीसोबत प्रेमसंबंध होते. ते एकाच भागात राहत. संतोषचा नालासोपार्‍यात एक फ्लॅट असून तेथे राहुल राहत होता. संतोषने तिला राहुलसोबत फ्लॅटवरच ठेवले. नायजेरियन फ्रॉडसारख्या अनेक गुन्‘ांमध्ये सहभागी असलेल्या संतोष आणि राहूलने राणीवर या कामात सहभागी होण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. तिने स्पष्ट नकार दिल्यावर संतोषच्या सांगण्यावरून राहुल व त्याचा मित्र ईशान यांनी राणीचा ओढणीने गळा आवळून खून केला. शवविच्छेदनाच्या अहवालात राणीची मान मोडल्याचे निष्पन्न झाले होते. डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे.राणीचा खून केल्यानंतर मृतदेह लाल रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये ठेवण्यात आला. त्यानंतर राहुल आणि ईशान यांनी मुंबईमधून एक टॅक्सी करून तळेगाव गाठले. तळेगाव रेल्वे स्थानकावर ही बॅग ठेवून आरोपी पुन्हा मुंबईला परतले. बॅगेत मृतदेह आढळल्यावर रेल्वेच्या अधिकार्‍यांनी श्वान पथकासह घटनास्थळी भेट दिली होती. त्यावेळी काही महत्त्वाचे दुवे हाती लागले होते. त्या आधारे पोलिसांनी नालासोपारामध्ये या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून संतोषला बेड्या ठोकण्यात आल्या. संतोष सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर ॲन्टॉप हिल, वडाळा, ट्रक टर्मिनल या पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी आणि मारामारीचेही गुन्हे दाखल आहेत.