शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बाळगंगा घोटाळा प्रकरणी तिघांना अटक व कोठडी

By admin | Updated: October 26, 2016 02:50 IST

बाळगंगा प्रकल्पातील कोकण पाटबंधारे विभागाचे तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीश बाबर, बी. जी. पाटील आणि आर. डी. शिंदे या तिघांना मंगळवारी अटक करण्यात आली.

ठाणे : बाळगंगा प्रकल्पातील कोकण पाटबंधारे विभागाचे तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीश बाबर, बी. जी. पाटील आणि आर. डी. शिंदे या तिघांना मंगळवारी अटक करण्यात आली. त्यांना ठाण्याच्या सत्र न्यायालयाने ८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आरोपपत्राची प्रत दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले. वर्षभरापूर्वीच या प्रकरणी ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर बाबर यांच्यासह दहा जणांविरोधात ३० हजार पानांचे आरोपपत्र ८ आॅगस्ट रोजी ठाण्याच्या विशेष न्यायालयात एसीबीने दाखल केले होते. आरोपपत्र दाखल होऊनही या तिघांना अटक झालेली नव्हती. न्यायालयाने त्यांना समन्स बजावल्याने पोलीस निरीक्षक विवेक जोशी यांच्या पथकाने त्यांना मंगळवारी आरोपपत्रासह हजर केले. राज्य सरकारच्या जलसंपदा विभागातर्फे बांधल्या जाणाऱ्या प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याच्या पार्श्वभूमीवर कोकण पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत येणाऱ्या प्रकल्पातील गैरव्यवहारासंदर्भात चौकशीचे आदेश ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष चौकशी पथकाने याप्रकरणाची चौकशी करुन २५ आॅगस्ट २०१५ ला कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. बाबर, तत्कालीन मुख्य अभियंता बाळासाहेब पाटील, ठाणे पाटबंधारे मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता रामचंद्र शिंदे, कोलाडचे तत्कालीन कार्यकारी अभियंता आनंदा काळुखे, तत्कालीन सहायक अभियंता राजेश रिठे, तत्कालीन शाखा अभियंता विजय कासट आणि एफए कंन्स्ट्रक्शन आणि एफए इंटरप्रायजेसचे भागीदार फतेह मोहमद अब्दुल्ला खत्री, निसार खत्री, अबीद फतेह खत्री, झाहीद फतेह खत्री या दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी खत्री, निसार खत्री, अबीद खत्री, झाहीद खत्री, रिठे, कासट यांना अटक झाली. (प्रतिनिधी)