शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सैन्याचे तीन कर्मचारी ताब्यात!

By admin | Updated: March 3, 2017 05:38 IST

सैन्य भरती पेपरफुटी घोटाळ्यामध्ये गुरुवारी नागपूर येथून सैन्य दलाच्या तीन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.

ठाणे : ठाणे पोलिसांनी उघडकीस आणलेल्या सैन्य भरती पेपरफुटी घोटाळ्यामध्ये गुरुवारी नागपूर येथून सैन्य दलाच्या तीन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.सैन्य भरती मंडळातर्फे (आर्मी रिक्रुटमेंट बोर्ड) २६ फेब्रुवारीला लिपिक आणि ट्रेड्समनसह ४ पदांसाठी देशभरात लेखी परीक्षा घेण्यात आली. त्याचा पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसांनी पुणे, नागपूर आणि गोव्यात छापा टाकून २१ आरोपींना अटक केली. नागपूर येथील सैन्य भरती कार्यालयातील (एरिया रिक्रुटमेंट आॅफीस) कर्मचारी धरमवीरसिंग, रवीकुमार आणि निगमकुमार पांडे यांचा या गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्याने पोलिसांनी गुरुवारी तिघांनाही ताब्यात घेतल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली. या कारवाईसाठी ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक नागपूर येथे गेले होते. हे पथक तिघांनाही घेऊन शुक्रवारी ठाण्यात दाखल होईल.दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन सीबीआयकडे याचा तपास सोपविला जाणार असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी अद्याप याबाबत कोणताही अधिकृत पत्रव्यवहार झाला नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)