शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

तटकरेंची एसीबीत साडेतीन तास चौकशी

By admin | Updated: October 21, 2015 03:25 IST

कोंढाणे धरण प्रकल्पातील आर्थिक गैरव्यवहारांसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मंगळवारी साडेतीन तास

मुंबई : कोंढाणे धरण प्रकल्पातील आर्थिक गैरव्यवहारांसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मंगळवारी साडेतीन तास चौकशी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कथित गैरव्यवहारांच्या खुल्या चौकशीचे आदेश गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दिले होते. वरळीतील एसीबीच्या मुख्यालयात झालेल्या या चौकशीसाठी तटकरे यांनी एसीबीच्या अधिकाऱ्यांची प्रथमच व्यक्तिश: भेट घेतली. चौकशीत तटकरे यांनी सहकार्य केले असून पुढेही होणाऱ्या चौकशीत ते सहकार्य करणार असल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले.यापूर्वी तटकरे यांना एसीबीने १५ व २१ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले होते. त्याचवेळी एसीबीने तटकरे किंवा त्यांचा वकील उपस्थित राहू शकेल, अशी सवलत दिली होती. मात्र या वकिलाला आर्थिक व्यवहारांची माहिती असली पाहिजे अशी अट घातली होती. ‘‘मला एसीबीने चौकशीसाठी बोलावले होते व त्या कामी मी त्यांना सहकार्य करीत आहे. पुढेही मी ते करीन’’, असे तटकरे यांनी एसीबी मुख्यालयातून बाहेर येताना सांगितले. सकाळी ११ वाजता तटकरे एसीबी मुख्यालयात आले व त्यांची पहिल्या मजल्यावर दुपारी अडीच वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, चौकशी अधिकारी सुनील कलगुटकर आणि अन्य २-३ अधिकाऱ्यांनी चौकशी केली.एसीबीचे महासंचालक विजय कांबळे यांनी तटकरे यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा कोणताही तपशील सांगण्यास नकार दिला. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे (केआयडीसी) तटकरे अध्यक्ष असताना प्रकल्पाचा खर्च अनेक पटींनी कसा वाढला याची खुली चौकशी एसीबी करीत आहे. या प्रकरणात एसीबीने अजून कोणताही गुन्हा नोंदवलेला नाही.